Baramati Lok Sabha : बारामतीत पवारांच्या लेकीचे पारडे जड, सुप्रिया सुळे 11 हजार मतांनी आघाडीवर
बारामतीचे पहिल्या फेरीचे आकडे हाती आले असून सुप्रिया सुळे सध्या आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत सुप्रिया सुळे बारामतीच्या सहाही विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहे. बारामतीत देखील सुप्रिया सुळे आघाडीवर आहे.
Baramati Lok Sabha Election: देशातील नव्हे, तर राज्यातील सर्वाधिक हाय व्होल्टेज असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये कोण विजयी होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बारमतीचे पहिल्या फेरीचे आकडे हाती आले असून सुप्रिया सुळे सध्या आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत सुप्रिया सुळे बारामतीच्या सहाही विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहे. बारामतीत देखील सुप्रिया सुळे आघाडीवर आहे.
बारामतीमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. अजित पवार यांनी बारामतीमध्ये पूर्ण ताकद पणाला लावली होती. पत्नी सुनेत्रा पवारच रिंगणात असल्याने अजित पवारांनी अगदी सोसायटीपर्यंत जाऊन प्रचार केला होता. मात्र, अजित पवारांना बारामतीकरांनी साथ न देता शरद पवारांना साथ दिल्याचे चित्र पहिल्या फेरीत दिसले आहे.
सुप्रिया सुळे 11532 मतांनी आघाडी
बारामतीचा सामना हा शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच रंगला होता. मात्र महायुतीच्या नेत्यांनी राहुल गांधी विरुद्ध मोदी असं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा फॉर्म्युला चालला नाही. सहाही विधानसभा मतदारसंघात सु्प्रिया सुळे आघाडीवर आहे. बारामतीत सुद्धा सुप्रिया सुळे आघाडी आहे. सुप्रिया सुळे 11532 मतांनी आघाडी घेतली आहे.
शेवटच्या टप्प्यात निवडणूक भावनिक
अजित पवार यांना या निवडणुकीतील काही गमक माहीत असावे. म्हणूनच की काय त्यांनी पहिल्या दिवसापासून ही निवडणूक विकासाच्या भोवती फिरवत ठेवली. त्यांनी शेवटपर्यंत भावनिक होऊ नका असे आवाहन केले. ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत भावनिक स्तरावर जायला नको यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. मात्र शेवटच्या पाच ते सहा दिवसात या निवडणुकीला भावनिक स्वरूप यायचे ते आलेच. सुरुवातीला अजित पवारांनी भावनिक होऊ नका, असे म्हणत त्यांनीच ही निवडणूक भावनिकतेकडे नेली होती. ‘या निवडणुकीत मला जर मिठाचा खडा लागला तर मी पुढे विधानसभेला विचार करेल’ असे म्हटलं होतं. तसेच संपूर्ण कुटूंब माझ्या विरोधात प्रचार करेल असे सांगितले होते. कुटूंबाने जरी एकटे सोडलं तुम्ही म्हणजे कार्यकर्त्यांनी एकटे सोडू नये अशी भावनिक साद अजित पवारांनी घातली होती. शरद पवारांच्या आणि अजित पवारांच्या सांगता सभेसाठी गर्दी जमवण्यात आलो होती.शरद पवारांना या वयात त्यांचा पक्ष आणि चिन्ह गेलं, शरद पवारांना हरवणे भाजपला जास्त महत्वाचे असल्याचं, जे आजपर्यंत भाजपला जमले नाही ते घर फोडून त्यांनी केलं. उमेदवार सापडला नाही म्हणून घरातीलच उमेदवार दिला असे सांगून भावनिक करण्यात आले. हळूहळू त्याला धार आली आणि शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक भावनिकतेकडे वळाली.