एक्स्प्लोर

Andheri East Bypoll 2022 : अंधेरी पोटनिवडणूक शिंदे गट लढण्याची शक्यता, भाजपाचे दावेदार मुरजी पटेल यांची माघार?

Andheri East Bypoll 2022 : अंधेरी पूर्व पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून ट्विस्ट अॅण्ड टर्न्सची मालिका सुरु आहे. त्यातच आता ही निवडणूक शिंदे गट लढवू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Andheri East Bypoll 2022 : अंधेरी पूर्व पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून ट्विस्ट अॅण्ड टर्न्सची मालिका सुरु आहे. ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा अजूनही मंजूर झाल्याने ठाकरे गटासमोरील पेच वाढलेला असतानाच आता ही निवडणूक शिंदे गट (Shinde Group) लढवू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अंधरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक शिंदे गट लढण्याची दाट शक्यता आहे. भाजप-शिंदे गट युतीमध्ये अंधेरी पूर्व मतदारसंघाची जागा बाळासाहेबांची शिवसेनेला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाचे दावेदार उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची चर्चा आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पहिला संघर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने या निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व पोटनिवडणूक ही ठाकरे आणि शिंदे गटातच लढली जाईल. निवडणूक आयोगाकडून नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाने संघर्ष करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे अंधेरी पूर्वच्या जागेवर भाजपने दाखवलेला दावा सोडल्यात जमा आहे.

भाजपकडून मुरजी पटेल हे या निवडणुकीसाठी तयारी करत होते. आता शिंदे गटाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली जाते की आणखी कोणाला संधी मिळते याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एकीकडे ऋतुजा लटके यांना देखील आपल्याकडून उमेदवारी देण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरु आहेत. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी एकापाठोपाठ एक घडामोडी घडत आहेत. या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटची तारीख 14 ऑक्टोबर आहे. त्याआधी शिंदे गटाचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता आहे. 

कोण आहेत मुरजी पटेल?
- मुरजी पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत.
- 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुरजी पटेल हे रमेश लटके यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. 
- राज्यात 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती जाहीर झाली होती. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभेची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. 
- त्यामुळे मुरजी पटेल यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. 
- पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल हे भाजपचे दावेदार उमेदवार समजले जात होते. परंतु आता त्यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे

ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्याने शिवसेना कोर्टात दाद मागणार
दुसरीकडे अंधेरी पोटनिवडणूक रंगात आलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न केल्यामुळे आता शिवसेना कोर्टात जाणार आहे. शिंदे गटाकडून ऋतुजा लटके यांच्यावर दबाव असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. 14 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असताना, मुंबई महापालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. त्यामुळे ठाकरे गट आता कोर्टात दाद मागणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Metro Protest | शरद पवारांचे कार्यकर्ते मेट्रो स्टेशनमध्ये घुसले, पोलिसांची धरपकड, काही आंदोलक पोलिसांच्या अंगावर आले..नेमकं काय घडलं?ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03PM 08 March 2025Anandache Paan : पेरिपल्स ऑफ हिंदुस्थान, खंडाबद्दल गप्पा; सुनंदा भोसेकर यांचं संशोधनात्मक लिखाण | 09 March 2025Raj Thackeray : अंधश्रद्धेतून जरा बाहेर या, डोकी हलवा : राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
तब्बल 9 वर्षांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्क लोकार्पण, मी मुख्यमंत्री होण्याची वाट हे पार्क पाहत होतं, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
मुख्यमंत्री होण्याची वाट पतंजली फूड अँड हर्बल पार्क पाहत होतं; देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
BJP on Raj Thackeray : घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजली जाईल, संतोष देशमुखांना क्रूरपणे संपवलं, बारामतीत आक्राेश मोर्चात कुटुंबीय आक्रमक, Photos
रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजली जाईल, संतोष देशमुखांना क्रूरपणे संपवलं, बारामतीत आक्राेश मोर्चात कुटुंबीय आक्रमक, Photos
IND vs NZ Champions Trophy 2025 Final: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 'यांच्या' खांद्यांवर महत्त्वाची जबाबदारी; आणीबाणीच्या परिस्थिती निभावणार मोलाची भूमिका
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 'यांच्या' खांद्यांवर महत्त्वाची जबाबदारी; आणीबाणीच्या परिस्थिती निभावणार मोलाची भूमिका
Embed widget