Election Results 2023 LIVE updates : मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये भाजपची मोठी आघाडी; काँग्रेसची पिछेहाट

Assembly Election Results 2023 LIVE Updates : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांचा (Assembly Election Results) निकाल जाहीर होत आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Dec 2023 11:46 AM
Election Results 2023 : 4 पैकी 3 राज्यांत भाजप आघाडीवर

4 राज्यांच्या निकालात 3 राज्यांत भाजप आघाडीवर, पंतप्रधान मोदी मैदानात, जंगी सेलिब्रेशनचा प्लॅन, भाजप मुख्यालयात संबोधित करणार!

Telangana Election Results 2023 : तेलंगणात काँग्रेस आघाडीवर

तेलंगणात मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. सत्ताधारी बीआरएस पिछाडीवर आहे आणि काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसला 119 पैकी 66 जागांवर आघाडी, तर बीआरएस 39 जागांवर आघाडीवर आहे आणि भाजपला 10 जागा मिळाल्या आहेत.

Chhattisgarh Election Results 2023 : छत्तीसगडमध्ये काँग्रेस-भाजपमध्ये काँटे की टक्कर

छत्तीसगडमध्ये काँग्रेस-भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळते. पिछाडीवरुन भाजप पुन्हा आघाडीवर आला आहे. 90 जागांच्या विधानसभेत भाजप 49 तर, काँग्रेस 39 जागांवर आघाडीवर आहे. 

Rajasthan Election Results 2023: राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर

राजस्थानातही भाजपची आगेकूच पाहायला मिळते. 199 जागांपैकी 109 जागांवर भाजपची आघाडी आहे. सत्ताधारी काँग्रेसला आतापर्यंत 71 जागा मिळाल्या असून, फायनल निकालात कोण बाजी मारणार? याकडे लक्ष आहे. 

Telangana Election Results 2023 : तेलंगणात काँग्रेस कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष

कलांनुसार, तेलंगणामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे. निवडणूक आयोगाच्या कलांनुसार, तेलंगणा राज्यात काँग्रेस 52 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 10 जागांवर आघाडीवर आहे.





Madhya Pradesh Elections Result 2023 : मध्य प्रदेशात भाजपची आघाडी

मध्य प्रदेशात सर्व 230 जागांचे कल हाती, भाजपला 140 जागांवर आघाडी, काँग्रेस 89 जागांच्या आघाडीसह दुसऱ्या नंबरवर, अंतिम निकालाकडे लक्ष

Chhattisgarh Election Results 2023 : छत्तीसगडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत

छत्तीसगडमध्ये भाजपने अर्धशतक गाठलं आहे, 50 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर 38 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.

Madhya Pradesh Elections Result 2023 : मध्यप्रदेशात भाजपची मोठी आघाडी, काँग्रेसची पिछेहाट

मध्यप्रदेशात भाजप 141 जागांवर आघाडीवर आहे. तर 86 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.

Telangana Election Results 2023 : तेलंगणात काँग्रेसने गाठला बहुमताचा आकडा

तेलंगणामध्ये 65 जागांसह काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. तर भाजप केवळ 2 जागांवर आघाडीवर आहे. सत्ताधारी बीआरएसला 46 जागा आहेत.

Rajasthan Election Results 2023: राजस्थानमध्ये भाजपला पूर्ण बहुमत

राजस्थानमध्ये भाजप चांगलाच आघाडीवर आहे. राजस्थानमध्ये भाजप 130 जागांवर आघाडीवर आहे. अशोक गेहलोत यांनी चांगलीच मुसंडी मारली आहे. तर राजस्थानमध्ये काँग्रेस 61 जागांवर आघाडीवर आहे. 

Madhya Pradesh Elections Result 2023 : मध्यप्रदेशात भाजपची मोठी आघाडी, काँग्रेसची पिछेहाट

मध्यप्रदेशात भाजप 150 जागांवर आघाडीवर आहे. तर 79 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.

Chhattisgarh Election Results 2023 : छत्तीसगडमध्ये काँग्रेसला बहुमत

छत्तीसगडमध्ये काँग्रेसची 46 जागांवर आघाडी आहे, तर भाजप 43 जागांवर आघाडीवर आहे.

Madhya Pradesh Elections Result 2023 : मध्यप्रदेशात सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपची मोठी आघाडी, बहुमताचा आकडा पार

मध्यप्रदेशात सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. कलांनुसार भाजप सत्तास्थापनेच्या जवळ आहे. भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजप 120 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 95 जागांवर आघाडीवर आहे.

Madhya Pradesh Elections Result 2023 : मध्य प्रदेशात भाजप बहुमताच्या जवळ

कलानुसार, मध्य प्रदेशमध्ये भाजप 114 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 88 जागांवर आघाडीवर आहे. भाजप बहुमताच्या आकड्याच्या फार जवळ आहे.

Chhattisgarh Election Results 2023 : छत्तीसगडमध्ये भाजप-काँग्रेसला समान जागा

छत्तीसगडमध्ये भाजप-काँग्रेसला समान जागा मिळाल्या आहेत. आलेल्या कलांनुसार, दोन्ही पक्षांना 37-37 जागा मिळाल्या आहेत.

Madhya Pradesh Elections Result 2023 : मध्य प्रदेशात भाजपची आघाडी

आतापर्यंतच्या कलानुसार, मध्य प्रदेशमध्ये भाजप 101 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 83 जागांवर आघाडीवर आहे.

Rajasthan Election Results 2023 : राजस्थानात भाजपचं शतक, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये काँग्रेस बहुमताच्या दिशेने

तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. तिकडे मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे. तर राजस्थानात भाजपने शतक पार केलं आहे. राजस्थानात  एकूण १९९ जागांसाठी मतदान झालं आहे. राजस्थानात भाजप १००, काँग्रेस ८० आणि इतर १९ जागांवर आघाडीवर आहेत

Rajasthan Election Results 2023: राजस्थानमध्ये भाजपने गाठलं बहुमत

राजस्थानमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. राजस्थानमध्ये भाजप 100 जागांवर, तर काँग्रेस 70 जागांवर आघाडीवर आहे.

Madhya Pradesh Elections Result 2023 Live:  मध्य प्रदेशात भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर, दोन्ही पक्षांना समसमान आघाडी

मध्य प्रदेशात भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. सध्याच्या कलानुसार दोन्ही पक्षांना समसमान 73-73 जागांवर आघाडी मिळाली आहे. 

Telangana Election Results 2023 : तेलंगणात काँग्रेसने बहुमताचा 60 जागांचा आकडा गाठला

Telangana  congress : तेलंगणामध्ये काँग्रेसने बहुमताचा 60 जागांचा आकडा गाठला, पहिल्या कलांनुसार एकूण 119 जागांपैकी काँग्रेस बहुमताच्या दिशेने, सत्ताधारी बीआरएसची पिछेहाट

Chhattisgarh Election Results 2023 : छत्तीसगडमध्ये काँग्रेस बहुमताच्या दिशेने

छत्तीसगडमध्ये काँग्रेस बहुमताच्या दिशेने, काँग्रेसला ३६ तर भाजपला ३२ जागांवर आघाडी, छत्तीसगडमध्ये एकूण ९० जागा 

Madhya Pradesh Elections Result 2023 Live: मध्य प्रदेशात काट्याची लढत, काँग्रेस-भाजपमध्ये चुरस

मध्य प्रदेशात  101 जागांचे कल हाती आले आहेत. इथे काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची लढत होत आहे. दोन्ही पक्ष निम्म्या निम्म्या जागांवर आघाडीवर आहेत

Rajasthan Election Results 2023: राजस्थानमध्ये भाजप 53 आणि काँग्रेस 50 जागांवर आघाडीवर

Rajasthan Election Results 2023: राजस्थानमध्ये भाजप 53 आणि काँग्रेस 50 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर जागांवर 14 आघाडीवर आहेत.

MP Election Results 2023: मध्यप्रदेशात भाजप 57 आणि काँग्रेस 55 जागांवर आघाडीवर

MP Election Results 2023: मध्यप्रदेशात भाजप 57 आणि काँग्रेस 55 जागांवर आघाडीवर आहे. छिंदवाडामधून कमलनाथ आघाडीवर आहे.

Sachin Pilot Rajasthan Election Results 2023 : सचिन पायलट आणि अशोक गहलोत आघाडीवर

राजस्थान विधानसभा निवडणुकीचे कल हाती येत आहेत, टोंक विधानसभा मतदारसंघातून सचिन पायलट आणि सरदारपुरा विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री अशोक गहलोत आघाडीवर आहेत. 

Election Results 2023 Live: पोस्टल मतमोजणीला सुरूवात, पहिला कल येणार काही मिनिटात

Election Results 2023 Live:  लोकसभेच्या रंगीत तालमीचा कारण काही क्षणात राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यांचा निकालांचा कल आपल्याला समजणार आहे.. या चार राज्यातली तीन राज्य तर महाराष्ट्राची शेजारी राज्य आहेत. त्यामुळे या राज्यातल्या निकांलांचा परिणाम देशपातळीसह महाराष्ट्रातल्या आगामी निवडणूकांवरही होणार का याची उत्सुकता असेल..

 MP Election 2023: मध्यप्रदेशच्या गडावर कोणाचा झेंडा फडकणार?

 MP Election 2023:  मध्यप्रदेशमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार कमलनाथ यांच्या छिंदवाडा विधानसभा क्षेत्राच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. छिंदवाडाच्या पीजी गव्हर्मेंट कॉलेजमध्ये मतमोजणी होणार आहे.  छिंदवाडा जिल्ह्यातील सर्व सात विधासभा  क्षेत्राची मतमोजणी देखील होणार आहे. त्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून बिना प्रवेशिका कोणालाही आतमध्ये सोडले जात नाही आहे

Chhattisgarh Election Result 2023 : छत्तीसगडमध्ये 90 जागांसाठी मतमोजणी

Chhattisgarh Election Result 2023 : छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) निवडणूक आयोगाकडून आज मतमोजणी (Vote Counting) होणार आहे. छत्तीसगडमध्ये पुढील पाच वर्षांसाठी कोणत्या पक्षाची सरकार स्थापन होणार आहे, हे आज स्पष्ट होईल. छत्तीसगड राज्यातील 90 जागांवर एकाचवेळी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाकडून सर्व जागांवर पूर्ण तयारी करण्यात आली असून स्ट्राँग रूमच्या बाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Telangana Election Result 2023 : चंद्रशेखर रावांना धक्का बसणार ही काँग्रेस सत्तेत येणार?

Telangana Election Result 2023 :  चंद्रशेखर रावांना धक्का बसणार ही काँग्रेस सत्तेत येणार? भाजपची स्थिती नेमकी काय? तेलंगणाच्या निवडणूक निकालाचे सर्व अपडेट जाणून घ्या


Telangana Election Result 2023 : चंद्रशेखर रावांना धक्का बसणार ही काँग्रेस सत्तेत येणार? भाजपची स्थिती नेमकी काय? तेलंगणाच्या निवडणूक निकालाचे सर्व अपडेट 


 

पार्श्वभूमी

5 States Election Results मुंबई : मिनी लोकसभा (Mini Lok Sabha) म्हणून पाहिल्या जात असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांची (Assembly Election Results) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता पाचपैकी चार राज्यांचा निकाल जाहीर होत आहे. मिझोराममध्ये सोमवारी 4 डिसेंबरला मतमोजणी होईल. लोकसभेच्या निवडणुकांची (Lok Sabha Election) रंगीत तालीम म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जात आहे. पाच राज्यांचा निकाल जाहीर होण्यापूर्वी विविध संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलचे (Exit Poll 2023) आकडे समोर आले. आता प्रत्यक्षात कोण बाजी मारणार याकडे देशाचं लक्ष लागलं.


Election Results 2023 LIVE  updates राजस्थान विधानसभा निवडणूक निकाल 2023 (Rajasthan Assembly Election Results 2023 LIVE) 


राजस्थान विधानसभा निवडणूक (Rajasthan Vidhan Sabha Election 2023) निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. राजस्थानात 199 जागांसाठी 25 नोव्हेंबरला मतदार पार पडलं. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस (Rajasthan Congress) सरकार सत्ता टिकवणार की भाजप (BJP Rajasthan) बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे.  


Election Results 2023 LIVE  updates राजस्थान विधानसभा निवडणूक पक्षीय बलाबल 2018 (Rajasthan Election result 2018)



  • भाजप (BJP) - 100

  • काँग्रेस (Congress) - 73

  • बसपा - 6

  • इतर - 21

  • एकूण 200


मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2023  (Madhya Pradesh Assembly Election Results 2023 LIVE)   


 मध्य प्रदेशच्या विधानसभेच्या 230 जागांसाठी 17 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. 80 टक्के मतदारांनी आपले मतदान केलं. त्यामुळे 230 जागा असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) हे भाजपची सत्ता कायम ठेवतात की काँग्रेसचे कमलनाथ (Kamal Nath) बाजी मारतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


मध्य प्रदेश विधानसभेतील सध्याचं पक्षीय बलाबल (Madhya Pradesh Election Result 2018) 



  • भाजप - 165 

  • काँग्रेस - 58

  • बहुजन समाज पक्ष - 4

  • इतर - 3 


छत्तीसगड विधानसभा निवडणूक निकाल 2023 (Chhattisgarh Assembly Election Results 2023 LIVE)  


छत्तीसगड विधानसभा निवडणूक निकाल 2023 कडे (Chhattisgarh Vidhan Sabha Election result 2023) देशाचं लक्ष लागलं आहे. तुलनेनं छोटं मात्र महत्वाचं असं राज्य आहे छत्तीसगड. इथल्या 90 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पडलं. पहिल्या टप्प्यात 7 नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यात  17 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस (Chhattisgarh Congress) सरकार सत्ता टिकवणार की भाजप (BJP Chhattisgarh) बाजी मारणार हे निकालात स्पष्ट होईल.   


तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल 2023  (Telangana Assembly Election Results 2023 LIVE)    


तेलंगणा विधानसभा निवडणूक 2023 (Telangana Vidhan Sabha Election 2023) निकाल आज जाहीर होत आहे. आज 30 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं.  तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांच्या नेतृत्त्वातील भारत राष्ट्र समिती(Bharat Rashtra Samiti Telangana) सरकार सत्ता टिकवणार की काँग्रेस (Congress) बाजी मारणार हे निकालात स्पष्ट होईल.  तेलंगणामध्ये विधानसभेच्या 119 जागा आहेत. बहुमतासाठी 60 जागांची गरज आहे.  


मिझोराम विधानसभा निवडणूक निकाल 2023 (Mizoram Assembly Election Results 2023 LIVE)   


मिझोराममध्येही 3 डिसेंबरला मतमोजणी नियोजित होती, मात्र ही तारीख ऐनवेळी बदलून 4 डिसेंब करण्यात आली. मिझोराममध्ये विधानसभेच्या 40 जागा आहेत. ईशान्य भारतातील मिझोरममध्येही 40 विधानसभा जागांसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं.बहुमतासाठी 21 जागांचा टप्पा कोण गाठतं याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 


संबंधित बातम्या 


Poll Of Exit Polls : पाचपैकी तीन राज्यांत काँग्रेस, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणात काँग्रेसचा 'हात', राजस्थानची कमळाला साथ, पोल ऑफ पोल्सचा अंदाज

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.