छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra Assembly Election Results 2024) शनिवारी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी निकालानंतर शरद पवारांसोबत (Sharad Pawar) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गेले तरी शिंदेंचा निर्णय मान्य असेल, असे वक्तव्य केले होते. यामुळे एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे एकत्र येणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. तर भाजपने संजय शिरसाट यांचं अधिकृत नसेल, असा दावा केला होता. आता संजय शिरसाट यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 


नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट? 


आम्ही शरद पवारांसोबत जाणार नाही. तेच कुठे जाणार हा प्रश्न आहे. महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाले आहे, असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे. तर शरद पवार शिंदेंना पाठिंबा देतील का? असे विचारले असता संजय शिरसाट म्हणाले की, शरद पवार काहीही करू शकतात, त्यांच्या भूमिकेवर कुणीही सांगू शकत नाही. कुणी आम्हाला बळजबरीने पाठिंबा देत असेल तर काय सांगणार, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता शरद पवार गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


नाना पटोलेंनी जावई शोध लावलाय


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे वक्तव्य केले. याबाबत संजय शिरसाट म्हणाले की, नाना पटोले यांनी काही जावई शोध लावला आहे. एकनाथ शिंदे नाराज नाही तर आक्रमक असतात, ते रडत नाही लढत असतात. काँग्रेसला उबाठाला सोबत घ्यायचे नाही, असे त्यांना वाटत आहे. काँग्रेसमध्येच एकमत नाही. पोलचे अंदाज पाहिल्यास महाविकास आघाडीला स्थान नाही, त्यामुळे ही जी काही धावपळ सुरू आहे, हा सर्व प्रकार म्हणजे विरोधी पक्षनेते कोण होईल यासाठी सुरू आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.


एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत 


महाविकास आघाडी कमकुवत झाली आहे. महायुतीत वाद होण्याचे कोणतेही कारण नाही. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाला अधिक पसंती आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत वरीष्ठ नेते निर्णय घेतील. तडजोड करण्याची वेळ येणार नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे, ही आमची मागणी आहे. मुख्यमंत्रीपदाच्या निकालाबाबत बैठक बोलावली जाईल, माजी आमदार देखील बोलावले जातील, त्यानंतर निर्णय होईल, असे त्यांनी म्हटले. 


आणखी वाचा 


भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड