एक्स्प्लोर

Election Results 2022 : गुजरात-हिमाचलमध्ये आज विधानसभेचा निकाल जाहीर होणार, सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात

आज गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये (Gujarat-Himachal) विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

Gujarat-Himachal Election Results 2022 : गुजरात आणि हिमाचल प्रदेश (Gujarat-Himachal) या दोन राज्यांच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज या दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी (Assembly Election Results) पार पडणार आहे. या दोन्ही राज्यात सत्तेची सुत्र कोणाच्या हातात जाणार ते आज स्पष्ट होणार आहे. या निकालाकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील मतमोजणी केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यात सध्या भाजपचं सरकार आहे. त्यामुळं या दोन्ही राज्यात भाजप सत्ता राखणार की विरोधक त्यांच्याकडून सत्ता खेचून आणणार हे आज स्पष्ट होणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबरला मतदान झाले होते. तर गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान झाले होते. गुजरातमधील 37 केंद्रांवर आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी पी. भारती यांनी सांगितले आहे.

गुजरातमध्ये 92 हा बहुमताचा आकडा

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील मतमोजणी केंद्रांभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 182 सदस्यीय राज्य गुजरात विधानसभेसाठी बहुमताचा आकडा 92 आहे. गुजरातमध्ये एकूण 64.33 टक्के मतदान झाले आहे. हिमाचल प्रदेशात 12 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात 68 जागांसाठी मतदान झाले होते. हिमाचल प्रदेशमध्ये  75 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. या दोन्ही राज्यात कोण सत्तेत येणार याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 

सरुवातीला पोस्टल मतमोजणी होणार 

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 10,000 सुरक्षा कर्मचारी, निवडणूक अधिकारी आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली मतमोजणी केली जाणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) मनीष गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यभरात 59 ठिकाणी उभारण्यात आलेल्या 68 केंद्रांवर सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल. सुरुवातीला पोस्टल मतपत्रिकांची  मतमोजणी सुरू होईल. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता ईव्हीएमवरून मतमोजणी होईल. या निवडणुकीत एकूण 412 उमेदवार रिंगणात आहेत.

गुजरातमध्ये 27 वर्षापासून भाजपचे सरकार 

गेल्या 27 वर्षांपासून गुजरातमध्ये  भाजपचे सरकार आहे. गुजरातमध्ये भाजपची यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी 2002 मध्ये होती.त्यावेळी भाजपनं  182 सदस्यांच्या विधानसभेत 127 जागा जिंकल्या होत्या. गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत होत असली तरी यावेळी आम आदमी पक्ष निवडणूक लढवली आहे. त्यामुळं गुजरातमध्ये तिरंगी सामना झाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Himachal Pradesh Exit Poll : हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला फटका तर काँग्रेसला फायदा; सर्व्हेचा अंदाज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Embed widget