एक्स्प्लोर
Assembly Election 2019 | सोनिया गांधी, प्रियांका गांधी प्रचारापासून लांब का राहिल्या?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्या (19 ऑक्टोबर) संध्याकाळी पाच वाजता थंडावणार आहे. परंतु निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी महाराष्ट्रातील प्रचारापासून दूरच राहिल्या किंवा प्रचारासाठी वेळ दिलाच नाही.

फोटो सौजन्य : गेट्टी इमेज
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. भाजप-शिवसेना युतीचा प्रचार दणक्यात सुरु आहे. तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी राज्य पिंजून काढत आहेत. काँग्रेससाठी अस्तित्त्वाची लढाई असताना, पण अध्यक्षा सोनिया गांधी मात्र महाराष्ट्रात फिरकलेल्याच नाहीत. पराभवाच्या छायेत असल्यामुळे नेते महाराष्ट्रात यायला टाळत आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्या (19 ऑक्टोबर) संध्याकाळी पाच वाजता थंडावणार आहे. परंतु निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी महाराष्ट्रातील प्रचारापासून दूरच राहिल्या किंवा प्रचारासाठी वेळ दिलाच नाही. फक्त राहुल गांधी यांनी सभा घेतल्या. मात्र प्रियांका गांधी यांच्या रोड शोवर अद्याप निर्णय झालेला नाही. युतीमधील शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांची आज एकत्रित सभा होणार आहे. पण काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीची एकही एकत्रित सभा झालेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील शरद पवार आणि राहुल गांधी यांची एकत्रित सभा झाली नव्हती. एकूणच आघाडी झाली तरी प्रमुख नेते एका मंचावर आल्याचं चित्र दिसलं नाही. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी,अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांसारखे अनेक मंत्री, प्रमुख नेते महाराष्ट्रात आले. भाजप नेत्यांनी मुख्य शहरांमध्ये जाऊन पत्रकार परिषद, सभा घेऊन आक्रमक प्रचार केला. काँग्रेस प्रचारासाठी ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, मुख्यमंत्री अशोक गहलोत, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आले. पण पक्षाध्यक्ष असलेल्या सोनिया गांधी मात्र महाराष्ट्रात आल्या नाहीत. प्रियांका गांधी पण राज्यापासून लांब राहिल्या. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर दोन राज्यात निवडणुका आहेत. काँग्रेस अस्तित्त्वाची लढाई लढत असताना मैदानात मात्र प्रमुख नेते दिसत नाहीत की महाराष्ट्र काँग्रेस पराभवाच्या छायेत असल्यामुळे नेते महाराष्ट्रात यायला टाळत आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम




















