एक्स्प्लोर

Ashok Pawar : घृणास्पद प्रकार करुन आमच्या कुटुंबाला वेठीस धरायचंय का? त्यांना काळ माफ करणार नाही : अशोक पवार

Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांनी त्यांच्या मुलासोबत जे घडलं त्यावरुन पोलिसांनी सूत्रधाराचा शोध घ्यावा, असं म्हटलं आहे.

पुणे पुण्यातील शिरुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांचा मुलगा ऋषिराज पवार याचं अपहरण करुन त्याचे विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी ऋषिराज पवार यांनी शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली होती. या सर्व प्रकरणावर आमदार अशोक पवार यांनी अस्वस्थपणे त्यांची भूमिका मांडली आहे.दुर्दैवी.. दुःखद.. वेदनादायी.. घृणास्पद.. निंदनीय.. या चार शब्दांचा कॅप्शनमध्ये उल्लेख करत अशोक पवार यांनी त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.  

घडलेली घटना घृणास्पद

शिरुरचे आमदार अशोक पवार यांनी त्यांच्या मुलासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल भूमिका मांडली.  ते म्हणाले आज दुर्दैवी घटना घडली, घृणास्पद म्हणजे विरोधी माणसं कुठल्या थरापर्यंत जातात. आज माझ्या मुलाला मोटारसायकलवर असताना एकानं प्रचार करण्यासाठी नेलं, जवळच्या वस्तीत नेलं, तिथं गेल्यावर कोंडलं, त्याचा गळा पट्टीनं की फडक्यानं आवळला.  त्याला सांगितलं तू कपडे काढ, एका महिलेला विवस्त्र करुन अत्यंत घृणास्पद प्रकार केला.  आमच्या जीवनामध्ये आम्ही जे चांगलं वागतो, समाजाशी एकरुप होतो पण मनाला वेदना झाल्या, कुठल्या थराला जाणार आहेत ही लोकं असं अशोक पवार म्हणाले. 

काही लोकं भेटायला आले ते म्हणाले बापू त्या पोरांना माफ करा, अरे काय चाललंय, हा प्रकार काय आहे. खरं म्हणजे आमच्या सारख्याचं मन एकदम बेचैन झालं आहे. लोकशाहीत निवडणूक लोकशाही पद्धतीनं तुम्ही लढा. असे घृणास्पद प्रकार करुन आमच्या कुटुंबाला वेठीस धरायचं आहे का,  अत्यंत निंदनीय ही गोष्ट आहे. म्हणजे काळ यांना माफ करणार नाही. आता पोलीस खात्याला मी विनंती केली याची बारकाईनं चौकशी करा, याचा कोण सूत्रधार आहे हे शोधलं पाहिजे, समाज यांना माफ करणार नाही.  या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना की ज्यांना कुणी याच्यामध्ये कृत्य करण्यास भाग पाडलं असेल तो खरा माणूस शोधणं पोलीस खात्याचं लक्ष्य असलं पाहिजे. कारण यांना माफ केलं नाही पाहिजे. कुटुंबाला बदनाम करणं दु:खद अशी घटना आहे, असं अशोक पवार म्हणाले.

गृहखातं अपयशी ठरलंय : अमोल कोल्हे 

खासदार अमोल कोल्हे म्हणाले, आमदार अशोकबापू पवार यांच्या मुलाच्या बाबतीत घडलेली घटना गंभीर आणि संतापजनक आहे. एका लोकप्रतिनिधीच्या मुलाचे अपहरण होते, त्याला विवस्त्र करुन मारहाण करण्यात येते आणि त्यानंतर त्याचा व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करण्यात येते. हा एकंदर प्रकार महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या कशा चिंध्या उडाल्या आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कसे सपशेल फेल ठरले याचे प्रत्यंतर देणारी आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले. 

इतर बातम्या :

Pune News : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajan Salvi : उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
Santosh Deshmukh Case: बीडमध्ये घडामोडींना वेग, आधी पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणले;आता एसआयटीचे प्रमुख तपासाचा चार्ज घेणार
बीडमध्ये घडामोडींना वेग, आधी पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणले;आता वाल्मिक कराडच्या नार्को टेस्टची मागणी
धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, निफाडमध्ये  5 जणांवर गुन्हा दाखल
धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, निफाडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल
Santosh Deshmukh Case : मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 02 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRohit Pawar on Beed Police Station : बीड पोलीस स्टेशनमध्ये अचानक पाच नवे पलंग का मागवले?Maharashtra Cabinet Meeting : शंभर दिवसांचा रोड मॅप, खातेवाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठकTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 02 जानेवारी 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajan Salvi : उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
Santosh Deshmukh Case: बीडमध्ये घडामोडींना वेग, आधी पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणले;आता एसआयटीचे प्रमुख तपासाचा चार्ज घेणार
बीडमध्ये घडामोडींना वेग, आधी पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणले;आता वाल्मिक कराडच्या नार्को टेस्टची मागणी
धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, निफाडमध्ये  5 जणांवर गुन्हा दाखल
धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, निफाडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल
Santosh Deshmukh Case : मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
केंद्राचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना डीएपी खतं परवडणाऱ्या किमतीत मिळणार, सबसीडीसाठी निधी मंजूर, आता एक बॅग मिळणार..
केंद्राचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना डीएपी खतं परवडणाऱ्या किमतीत मिळणार, सबसीडीसाठी निधी मंजूर, आता एक बॅग मिळणार..
Alpha Gereration : मिलेनियल्स, जेन Z नंतर आता 'ही' जनरेशन; पिढ्यांची नावं कशी ठरवली जातात?
मिलेनियल्स, जेन Z नंतर आता 'ही' जनरेशन; पिढ्यांची नावं कशी ठरवली जातात?
Sanjay Raut : हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक अन् महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक अन् महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
Chhagan Bhujbal : नाराज छगन भुजबळ नाशिकमध्ये परतणार, परदेशवारीनंतर काय भूमिका घेणार? राज्याचं लक्ष
नाराज छगन भुजबळ नाशिकमध्ये परतणार, परदेशवारीनंतर काय भूमिका घेणार? राज्याचं लक्ष
Embed widget