Archana Ranajagjitsinh Patil : लोकसभेला पराभूत झाल्यानंतर अर्चना पाटील आता विधानसभेच्या रिंगणात, अपक्ष अर्ज भरला; पती राणा पाटील तुळजापुरातून मैदानात
Archana Ranajagjitsinh Patil : भाजप नेते राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.
Archana Ranajagjitsinh Patil, Dharashiv : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसलीये. दोन्ही आघाड्यांकडून जवळपास 288 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर दोन्ही आघाड्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी बंडखोरी झाली आहे. या शिवाय महत्त्वाचं म्हणजे काही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढती देखील पाहायला मिळणार आहेत.
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात भाजप नेते राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी आणि लोकसभेच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्चना पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात शेवटच्या क्षणाला महायुतीकडून म्हणजेच शिंदेंच्या शिवसेनेकडून अजित पिंगळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पिंगळे यांनी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला आणि गळ्यात उमेदवारीची माळ पडली. अर्चना पाटील हा महायुतीचा बॅकअप प्लॅन ?, की वेगळा डाव रंगणार ? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत अर्चना पाटील यांचा दारुण पराभव
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर मैदानात उतरले होते. ओमराजे निंबाळकर यांनी अर्चना पाटील यांचा 3 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता. आता अर्चना पाटील कळंब-धाराशिव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार आहेत. विशेष म्हणजे महायुतीकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली असताना अर्चना पाटील अपक्ष लढत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
राणा जगजितसिंह पाटील यांना भाजपची तुळजापूरमध्ये उमेदवारी
भाजप नेते राणा जगजितसिंह पाटील यांना महायुतीकडून तुळजापूर विधानसभा मतदारंसघात उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाने धीरज पाटील यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण या मतदारसंघात बंडखोरी करतील, असेही बोलले जाते आहे. दरम्यान, राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी दिलेली असताना त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढणार आहेत.
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात भाजप नेते राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी आणि लोकसभेच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज
अर्चनाताई पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आश्चर्य
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात शेवटच्या क्षणाला महायुतीकडून अजित पिंगळे यांना उमेदवारी
अजित पिंगळे यांचा भाजपमधून शिवसेनेत प्रवेश आणि गळ्यात उमेदवारीची माळ
अर्चना पाटील हा महायुतीचा बॅकअप प्लॅन ?, की वेगळा डाव रंगणार ?
इतर महत्त्वाच्या बातम्या