जय जिनेंद्र म्हणत अजित पवारांनी मुरलीधर मोहोळांना पुन्हा डिवचलं; निलेश घायवळच्या पासपोर्टचंही सांगितलं
पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी देण्यावरुन राजकीय वातावरण चांगलच गरम झालं आहे. भाजपने या मुद्यावरुन राष्ट्रवादीवर टीका केली होती. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Ajit Pawar on Muralidhar Mohol : पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी देण्याच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलच गरम झालं आहे. भाजपने या मुद्यावरुन राष्ट्रवादीवर टीका केली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोण गुन्हेगार आहे म्हणून पत्नीचा काय दोष आहे, कुटुंबाचा काय दोष आहे. मित्र पक्षांनी कोणाला उमेदवारी द्यावी त्यांचा अधिकार आहे. मी गुन्हेगारांना उमेदवारी दिली नाही. त्यांनी सांगितलं घड्याळ चिन्ह द्या असे अजित पवार म्हणाले. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी बोलताना अजित पवार म्हणाले की, बहुतेकांना कळलं आहे तो व्यवहार होऊ शकत नाही. त्याची जशी चौकशी झाली जय जिनेन्द्रच्याबाबत काय झाले, ते पण सगळ्यांना माहिती आहे, जय जिनेन्द्र... असे म्हणत अजित पवार यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना टोला लगावला.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चागलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
विरोधकांचींही कामं करा, पण आधी आपल्या नगरसेवकांच्या कामाला प्राधान्य द्या
विकासकामासंदर्भात ये रे माझ्या मागल्या असं काम करु नका. दर्जेदार कामं करा. चुकीच्या गोष्टींना थारा देऊ नका. तुम्हाला हावशे, नवशे, गवशे भेटतील. काम करणारे बाजूला राहतील आणि नको ती पिलावळ आजूबाजूला भटकतीत. ठीक आहे, त्यांना पण इज्जत द्या. विरोधकांचींही कामं करा, पण आधी आपल्या नगरसेवकांच्या कामाला प्राधान्य द्या. वाडपी आपला आहे, तर त्याचा फायदा नक्की घ्या. पण विरोधकांवर ही अन्याय होणार नाही याची काळजी घ्या असे ्जित पवार म्हणाले.
पुण्यातील कारभारी लोक कमी पडली म्हणून पुण्यातील रस्त्यावर खड्डे
नवले ब्रिजच काही बोलायला नको. सिंहगड फ्लायओवर काम चुकीच्या पद्धतीने झालं आहे. पुण्यातील कारभारी लोक कमी पडली म्हणून पुण्यातील रस्त्यावर खड्डे आहेत असे अजित पवार म्हणाले. पुण्याचे शिल्पकार आहेत असं म्हणतात त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. नियोजन शून्य कारभार असल्यामुळं पुण्यात पाणी प्रश्न निर्माण होत आहे. नाकर्तेपणामुळं पुण्यावर अशी वेळ आली आहे.12350 कचरा काम करणारे कर्मचारी आहेत. कोणाला दिसले तर मला कॉल करुन सांगा असेही अजित पवार म्हणाले. पुण्यातील प्रदूषणाने वाट लावली आहे. टॅक्स लावायला आणि घर पाडायला महापालिका अॅक्टिव्ह आहे मात्र सुविधा देण्यास सत्ताधारी अपयशी आहेत असे अजित पवार म्हणाले. पुणेकर चिडलेले आहेत, रागातून वेगळा विचार करतील मला खात्री आहे असे अजित पवार म्हणाले.
मला संधी दिली तर मी बदल करून दाखवणार
पुण्यातील त्रिकुट कारभारी बदलायला हवेत, मला संधी दिली तर मी बदल करून दाखवणार असे अजित पवार म्हणाले. ज्याच्या हातात शहाराची सूत्र होती त्यांनी काय अवस्था केलीय हे सांगण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरेसोबत असताना मी कुठेही कमी पडलो नाही, कोरोना काळातही असे अजित पवार म्हणाले.
मी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात बोलत नाही
मी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात बोलत नाही. मी चंद्रकांत पाटील यांच्या सुचनेची दखल घेत आहे. जे कारभार पाहात होते ते अपयशी झालेत असे अजित पवार म्हणाले. मी चुकीच्या गीष्टीचे समर्थन केलले नाही असे अजित पवार म्हणाले. संधी दिली तर मी आठवड्यातून दोन दिवस पुण्याला देईल एक दिवस पुणे एक दिवस पिंपरी - चिंचवड असे अजित पवार म्हणाले.
एक व्यक्ती घायावळ ती परदेशात पळून कशी गेली? अजित पवारांचा मोहोळांना टोला
मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या टीकेवर बोलताना अजित पवार म्हणाले की, त्यांनी माझ्यावर टीका केलीय.प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. एक व्यक्ती घायावळ ती परदेशात पळून कशी गेली? असा टोला अजित पवारांनी मोहोळांना लगावला. निवडणुकीनंतर एकत्र येणार का? असा सवालही अजित पवारांना केला. यावर बोलताना ते म्हणाले की, असा प्रश्न येणार नाही. आम्ही महापौर करण्याकरता हे सगळ सुरु आहे. आम्ही म्हणतोय आमचा महापौर होणार असे अजित पवार म्हणाले.





















