एक्स्प्लोर
मनसेसोबत युती करणार का? तरुणीच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणतात...
'आपली आणि भाजपची भूमिका वर्षानुवर्ष कायम आहे. जे सतत भूमिका बदलतात, त्यांच्यासोबत आपण गेलेलो नाही' असं म्हणत मनसेच्या बदललेल्या भूमिकेवर पुतण्याने काकाला टोला हाणला.
मुंबई : आज भाजपसोबत युती केली, भविष्यात मनसेसोबत युती करणार का? असा प्रश्न युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना विचारला, त्यावर- सतत भूमिका बदलणाऱ्यांसोबत आपण जात नाही, अशा शब्दात मनसे अध्यक्ष आणि काका राज ठाकरेंना त्यांनी टोला लगावलाय
'आज भाजपसोबत युती केली, भविष्यात मनसेसोबत युती करणार का?' असा सवाल आदित्यसंवाद या कार्यक्रमात एका तरुणीने आदित्य ठाकरेंना विचारताच सर्वत्र टाळ्यांच्या कडकडाट झाला. या प्रश्नावर आदित्य यांनी आपल्या ठाकरे शैलीतच उत्तर दिलं. 'आपली आणि भाजपची भूमिका वर्षानुवर्ष कायम आहे. जे विरोधात आहेत, सतत भूमिका बदलतात, त्यांच्यासोबत आपण गेलेलो नाही' असं म्हणत मनसेच्या बदललेल्या भूमिकेवर पुतण्याने काकाला टोला हाणला.
VIDEO | युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचं गाजलेलं भाषण | हॅलो, माईक टेस्टिंग
शिवसेनेने आणि भाजपने आपले विचार, भूमिका कधीच बदललेली नाही. ही युती देशहितासाठी झाली आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईतल्या NSUI मध्ये आदित्यसंवाद हा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम होत आहे.
शिक्षण, रस्ते, नाईट लाईफ यासारख्या प्रश्नांवर आदित्य ठाकरेंशी युवकांनी मनमुराद गप्पा मारल्या. वरळीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद मिळाला. आता पुढचा संवाद हा अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मतदारसंघात होणार आहे. त्यामुळे या संवादाकडेही मतदारांचं लक्ष लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
राजकारण
Advertisement