(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अब की बार पीएम मोदींच्या कामगिरीवर जनता किती समाधानी? ओपिनियन पोलमधून धक्कादायक खुलासा
Lok Sabha Election Opinion Poll 2024 : देशातील लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) जवळ आल्या आहेत. भाजप (BJP) आणि काँग्रेससह (Congress) देशभरातील इतर पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
Lok Sabha Election Opinion Poll 2024 : देशातील लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) जवळ आल्या आहेत. तीन ते चार महिन्यात निवडणुकीची घोषणा होऊ शकते. भाजप (BJP) आणि काँग्रेससह (Congress) देशभरातील इतर पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यादरम्यान सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केलेय. यामध्ये केंद्रातील मोदी सरकारच्या (PM modi) कामकाजाबद्दल प्रश्न विचारण्यात आलाय. या ओपिनियन पोलमध्ये बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राज्यस्थान, तेलंगणा, महाराष्ट्र, पंजाब, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यात सर्वेक्षण करण्यात आलेय.
ताज्या सर्वेक्षणानुसार, देशातील 47 टक्के नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाशी समाधानी आहेत. तर 30 टक्के लोक कमी समाधानी आहेत. 21 टक्के नागरिक मोदींच्या कामाशी समाधानी नाहीत. दोन टक्के लोकांनी याबाबत कोणतेही मत दिले नाही.
छत्तीसगड आणि बिहारमधील लोकांचा कौल काय ?
छत्तीसगडमधील लोकांनी या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधानांच्या कामावर समाधानी असल्याचे सांगितले. छत्तीसगडमध्ये 54 टक्के लोकांनी मोदींच्या कामकाजावर समाधानी असल्याचे सांगितले. 26 टक्के कमी समाधानी आहेत, तर 20 टक्के असमाधानी आहेत.
बिहारमधील 57 टक्के लोक मोदींच्या कामामुळे समाधानी आहेत, 22 टक्के कमी समाधानी आहेत आणि 20 टक्के लोक पंतप्रधानांच्या कामावर असमाधानी आहेत. तर 1 टक्के लोकांनी यावर मत मांडणं टाळलं.
राजस्थान अन् मध्य प्रदेशमधील लोकांचं काय म्हणणं?
राजस्थानमधील 56 टक्के लोक पंतप्रधानांच्या कामावर समाधानी आहेत. तर 25 टक्के लोक मोदींच्या कामावर कमी समाधानी आहेत. 19 टक्के लोकांनी असमाधानी असल्याचे सांगितलेय. मध्य प्रदेशातील 55 टक्के लोक पंतप्रधानांच्या कामावर समाधानी आहेत, 26 टक्के लोक कमी समाधानी आहेत. तर 19 टक्के असमाधानी आहेत.
उत्तर प्रदेशमधील काय स्थिती ?
मोदींच्या कामावर समधानी आहात का? या प्रश्नाच्या उत्तरात उत्तर प्रदेशातील 48 टक्के लोकांनी समाधानी असल्याचे सांगितले. 27 टक्के लोक कमी समाधानी आहेत. तर 25 टक्के लोक असमाधानी आहेत.
पंतप्रधान मोदी की राहुल ? डायरेक्ट पंतप्रधान कोण?
डायरेक्ट पंतप्रधान म्हणून निवडायचं झाल्यास कुणाला निवडाल.. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक पसंती मिळाली. उत्तर प्रदेशमधील 60 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींना पसंती दर्शवली. तर 30 टक्के लोकांनी राहुल गांधींच्या बाजूने कौल दिलाय. दोघेही नको म्हणून आठ टक्के लोकांनी मत नोंदवली. तर दोन टक्के नागरिकांनी यावर उत्तर देणं टाळलं.
टीप- सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केले आहे. यासाठी देशभरातील विविध राज्यातील लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस - मायनस 3 ते प्लस - मायनस 5 टक्के इतके आहे.