सिल्लोडमध्ये तुम्ही आमचं बिघडवू शकत नाही, पण आम्ही भोकरदनमध्ये तुमचं बिघडवलं; अब्दुल सत्तारांचा रावसाहेब दानवेंवर हल्लाबोल
Abdul Sattar on Raosaheb Danve: विशेष म्हणजे भोकरदन हे रावसाहेब दानवेंचे होम ग्राउंड असून, कन्नडमध्ये त्यांची मुलगी संजना जाधव भाजपच्या आमदार आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपला पराभव स्वीकारावा लागला.

Abdul Sattar on Raosaheb Danve: शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड नगर परिषदेवर असलेली एकहाती सत्ता कायम राखताच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर सडकून प्रहार केला आहे. निकाल येताच पुन्हा एकदा अब्दुल सत्तार म्हणाले की, सिल्लोडमध्ये प्रचार करणाऱ्यांचा आम्ही भोकरदनमध्ये सुपडासाफ केला. स्वतःचं गाव वाचवू शकत नाही, ते सिल्लोडमध्ये प्रचार करत होते असा खोचक टोलाही सत्तार यांनी दानवे यांना लगावला.
फुलंब्री आणि कन्नडमध्ये देखील आम्ही गणित बिघडवले
अब्दुल सत्तार म्हणाले की, फुलंब्री आणि कन्नडमध्येही आम्ही गणित बिघडवले. विशेष म्हणजे भोकरदन हे रावसाहेब दानवेंचे होम ग्राउंड असून, कन्नडमध्ये त्यांची मुलगी संजना जाधव भाजपच्या आमदार आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पुन्हा एकदा सत्तार विरुद्ध रावसाहेब दानवे असा राजकीय वाद रंगला आहे. दुसरीकडे सत्तार यांनी मुलाला नगराध्यक्ष करतानाच नगर परिषदेत 25 जागा जिंकत भाजपला हादरा दिला. रावसाहेब दानवे लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढतील ही अपेक्षाही फोल ठरली.
सत्तार यांचे एकहाती यश
सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांनी कोणत्याही पक्षाशी युती केली नव्हती. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे अब्दुल समीर सत्तार यांच्या विरोधात भाजपने मनोज मोरेल्लू यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा 23546 मतांनी पराभव झाला. भाजपच्या मोरेल्लू यांना 7892 एवढी मते मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पैठण, खुलताबादसह जिल्ह्यात सभा घेतल्या. पण सत्तार यांच्या सिल्लोडकडे लक्ष दिले नव्हते. रावसाहेब दानवे यांनी शेवटच्या टप्प्यात एक सभा घेतली होती.
इतर महत्वाच्या बातम्या





















