Maharashtra Government Formation | काँग्रेसशी बोलून पुढचा निर्णय घेऊ : जयंत पाटील
LIVE
Background
भाजप सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण पाठवलं आहे. परंतु शिवसेनेला सत्तास्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेनेच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्यातील सत्तास्थापनेचा पेच आणि शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात आज सर्वच पक्षांच्या बैठका होणार आहे. शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी आज संध्याकाळी 7.30 पर्यंतची वेळ आहे. त्या पार्श्वभूमीवर सगळ्याच घडामोडींना महत्त्व आहे.
राज्यात कोणत्याही पक्षाला सत्तास्थापन करण्यासाठी 144 आमदारांचं संख्याबळ असणं आवश्यक आहे. शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले आहेत. तर त्यांच्याकडे 8 अपक्ष आणि इतर पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा आहे. असे मिळून शिवसेनेकडे 64 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे शिवसेनेला अधिक 80 आमदारांची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीकडे 54 तर काँग्रेसकडे 44 आमदारांचे संख्याबळ आहे. तिन्ही पक्षांकडे मिळून 162 आमदारांचे संख्याबळ आहे.
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. दिल्लीत काँग्रेसची सकाळी 10 वाजता बैठक, शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, सोनिया गांधी, मलिक्कार्जुन खरगे, मधुसूदन मिस्टर, वेणुगोपाल, अहमद पटेल बैठकीला उपस्थित राहणार
2. शरद पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची आज सकाळी 10 वाजता बैठक, बी वाय सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा
3. शिवसेना आमदारांची हॉटेल 'द रिट्रीट'वर आज सकाळी 9.30 वाजता महत्त्वाची बैठक, राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिल्यानंतर सर्व आमदारांना सज्ज राहण्याचे आदेश
4. भाजप कोअर कमिटीची आजही बैठक, सकाळी अकरा वाजता 'वर्षा' बंगल्यावर खलबतं, राज्यातील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार.
5. सत्तास्थापनेसाठी भाजपने असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपालांचं सेनेला निमंत्रण, निर्णयासाठी आज संध्याकाळी साडेसातपर्यंत अवधी, सेनेकडून आजच दावा केला जाणार
संबंधित बातम्या
संजय राऊत शरद पवारांना भेटण्यासाठी दिल्लीला जाणार, सत्तास्थापनेसाठी शिवसेनेच्या हालचालींना वेग
Maharashtra Government Formation | आजचा दिवस महत्त्वाचा; काय काय घडणार?