Loksabha Election 2019 LIVE BLOG : राज्यात पाच वाजेपर्यंत 57 टक्के तर देशभरात सहा वाजेपर्यंत 59.25 टक्के मतदान
LIVE
Background
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील चौथ्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचं मतदान आज होणार आहे. या टप्प्यात राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडेल आहे. चौथ्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह प्रमुख लढतींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. देशभरातील नऊ राज्यातील 71 जागांवर मतदान होणार आहे.
चौथ्या टप्प्यात उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, कल्याण, मावळ, शिरुर, नाशिक, शिर्डी, नंदुरबार, धुळे आणि दिंडोरी या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
अरविंद सावंत, मिलिंद देवरा, राहुल शेवाळे, गजानन कीर्तिकर, उर्मिला मातोंडकर, संजय निरुपम, पूनम महाजन, प्रिया दत्त, राजन विचारे, समीर भुजबळ यासारख्या दिग्गज उमेदवारांचं भवितव्य मतयंत्रात बंदिस्त होणार आहे.
चौथ्या टप्प्यातील प्रमुख लढती
ईशान्य मुंबईत भाजपने विद्यमान खासदार किरीट सोमय्यांना डावलून मनोज कोटक यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे मनोज कोटक विरुद्ध संजय दिना पाटील अशी लढत होणार आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईत भाजप आपली जागा राखतं का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उत्तर-मुंबईत भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर रिंगणात आहे. उत्तर-मध्य मुंबईत पूनम महाजन विरुद्ध प्रिया दत्त अशी रंगतदार लढत होणार आहे.
दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांच्यासमोर माजी खासदार मिलिंद देवरा यांचं आव्हान आहे. उत्तर-पश्चिममध्ये शिवसेनेच्या गजानन कीर्तिकरांविरुद्ध मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम मैदानात उतरले आहेत. दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळेंना एकनाथ गायकवाड तगडी टक्कर देणार आहेत.
मावळमध्ये पवार कुटुंबातील तिसरी पिढी अर्थात अजित पवार यांने पुत्र पार्थ पवार रिंगणात आहे. त्यांच्याविरुद्ध शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचं आव्हान आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या आढळराव पाटलांविरोधात अभिनेते आणि शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या अमोल कोल्हेंनी आव्हान उभं केलं आहे. तर नाशिकमध्ये पुन्हा एकदा हेमंत गोडसे आणि समीर भुजबळ यांच्यात तडगी फाईट होण्याची शक्यता आहे.
चौथ्या टप्प्यात बिहार, जम्मू काश्मिर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या नऊ राज्यात मतदान होणार आहे.
चौथा टप्पा (71)
बिहार - 5
जम्मू काश्मिर - 1
झारखंड - 3
मध्य प्रदेश - 6
महाराष्ट्र - 17
ओदिशा - 6
राजस्थान - 13
उत्तर प्रदेश - 13
वेस्ट बंगाल - 8