एक्स्प्लोर

National Election Results Live Blog : लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Election Results 2019 Live Updates, ABP Majha Lok Sabha Elections Results 2019 in Marathi Latest Updates National Election Results Live Blog : लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Background

मुंबई : लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाची सांगता आज 23 मे रोजी होणार आहे. देशभरातील 543 पैकी 542 मतदारसंघाच्या मतमोजणीला आज सकाळी वाजता सुरुवात होणार आहे. अर्ध्या तासानंतरच कल हाती येण्यात सुरुवात होईल. सत्ताधारी भाजप पुन्हा सत्तेत येणार की काँग्रेस 2014 मधील आपल्या कामगिरीत सुधारणा करणारहे आज मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.

11 एप्रिल ते 19 मे दरम्यान लोकसभेच्या 542 जागांच्या मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडले होते. ही निवडणूक सात टप्प्यात पार पडली. या सात टप्प्यात 90.99 कोटी मतदारांपैकी जवळपास 67.11 टक्के मतदारांनी आपल्या मताचा वापर केला. देशात लोकसभा निवडणुकीसाठी झालेलं हे सर्वाधिक मतदान आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकूण 8040 उमेदवार मैदानात उतरले होते. त्यापैकी टॉप 10 श्रीमंत उमेदवारांची एकूण संपत्ती जवळपास 2,218 कोटी आहे.

निवडणूक लढणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, सपा प्रमुख अखिलेश यादव, अनेक केंद्रीय मंत्री यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

2019 लोकसभा निवडणुकीची वैशिष्ट्ये

- 29 राज्य 7 केंद्रशासित प्रदेश
- 39 दिवस चाललेली सात टप्प्यात पार पडलेली निवडणूक
- 8040 नशीब आजमावणारे उमेदवार
- तब्बल 91 कोटी 1 लाख मतदार, 47 कोटी 16 लाख पुरुष आणि 43 कोटी 84 लाख स्त्री मतदार तर 39 हजार तृतीयपंथी
- 10 लाख 38 हजार 96 मतदान केंद्र
- विक्रमी 67.10 टक्के मतदान

Abp Result 2019 | एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकालांचे अपडेट्स कसे पाहाल?| ABP Majha

देशात पहिल्यांदाच ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी होणार असल्याने निकाल उशिरा येण्याची शक्यता आहे. यासाठी कर्मचाऱ्यांची ड्युटीही लावली असून सगळ्यांना याबाबत प्रशिक्षणही दिलं आहे. मतमोजणीसाठी प्रशासनातर्फे संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. यावेळी इथे निवडणूक निर्णय अधिकारीउमेदवारनिवडणूक एजंटमोजणी एजंट उपस्थित असतील. शिवाय मतमोजणीची व्हिडीओग्राफीही होईल.

ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची मोजणी कशी होणार?

लोकसभा मतदारसंघनिहाय 22 पासून 40 पर्यंत मतमोजणीचा ईव्हीएम फेऱ्या होणार आहेत.

ईव्हीएमची एक फेरी पूर्ण होण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी लागेल.

यानंतर व्हीव्हीपॅटचा मोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 650 आणि जास्तीत जास्त 1250 मतदार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी. म्हणजे एकूण लोकसभा मतदारसंघातल्या 30 व्हीव्हीपॅटची मोजणी होईल.

चिठ्ठ्या टाकून व्हीव्हीपॅटची निवड होईल. व्हीव्हीपॅटचा एका मशिनच्या मोजणीला 45 मिनिटांचा कालावधी लागेल. उमेदवाराने आक्षेप घेतले तर हा कालावधी वाढेल. असा एकूण प्रत्यक्षात निकाल यायला 12 तासापासून 14 तासांपर्यंतचा कालावधी लागू शकतो.

प्रादेशिक पक्षांमध्ये लढत

ही सार्वत्रिक निवडणूक असली तर काही राज्यांमध्ये मुख्य लढत प्रादेशिक पक्षांमध्ये आहे. काही राज्यात काँग्रेस आणि भाजप सामन्यातून बाहेर आहेत. उदाहरणार्थ तामिळनाडूमध्ये मुख्य सामना द्रमुक आणि अन्नाद्रमुक यांच्यात आहे. आंध्र प्रदेशात टीडीपी आणि वायएसआर यांच्यात मुख्य सामना आहे. तर तेलंगणामध्ये प्रादेशिक पक्ष टीआरएस सत्तेत आहे.

उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा यांचं महागठबंधन सत्ताधारी भाजपला आव्हान देत आहे.

देशात सात टप्प्यात असं झालं मतदान

11 एप्रिलपहिला टप्पा : 20 राज्यात 91 मतदारसंघात 69.61 टक्के मतदान झालं

18 एप्रिलदुसरा टप्पा : 13 राज्यात 95 मतदारसंघात 69.44 टक्के मतदान झालं

23 एप्रिलतिसरा टप्पा : 15 राज्यात 117 जागांसाठी 68.40 टक्के मतदान झालं

29 एप्रिलचौथा टप्पा : राज्यात 71 जागांसाठी 65.51 टक्के मतदान झालं

मेपाचवा टप्पा : राज्यात 51 मतदारसंघासाठी 64.16 टक्के मतदान झालं

12 मे सहावा टप्पा : राज्यात 59 जागांसाठी 64.58 टक्के मतदान झालं

19 मे सातवा टप्पा : राज्यात 59 जागांसाठी 65.16 टक्के मतदान झालं

संबंधित बातम्या

Loksabha Elections 2019 Results : मतदारसंघांचे राज्यनिहाय अचूक निकाल, कुठे आणि कसे मिळवाल?

निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज, व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांच्या मोजणीमुळे निकाल उशीरा

त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास बिगर भाजप सरकार स्थापण्याची विरोध पक्षांची तयारी

लोकसभा निवडणूक निकाल : 'माझा'च्या खास डायरीतून निकालाबाबत दिग्गजांचे एक्सक्लुझिव्ह अंदाज

20:13 PM (IST)  •  23 May 2019

20:12 PM (IST)  •  23 May 2019

लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
Nagpur Election Results 2026: CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 : CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले

व्हिडीओ

Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं
Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
Nagpur Election Results 2026: CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 : CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget