LIVE BLOG : उद्या शिवसेना-भाजप युतीची घोषणा- सूत्र

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Sep 2019 10:03 PM
मुंबई: आमचं ठरलंय, पण काही जागांवर अडलंय...उद्याच्या सेना-भाजप संयुक्त पत्रकार परिषदेबाबत
शिवसेनेकडून दुजोरा नाही. आज रात्री उशीरापर्यंत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा. तोडगा न निघाल्यास जागावाटपाची घोषणा लांबणीवर
भाजप शिवसेना युतीच्या घोषणेचा मुहूर्त ठरला, उद्या भाजप शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत होणार घोषणा
मुंबई : तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलची वाहतूक बंद, विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानं मोनोरेल ठप्प, वाशी नाका परिसरात मोनोरेल बंद पडल्याने पुढील वाहतूक ठप्प, दुपारी एक वाजता मोनेरेल पुन्हा सुरु करण्यात येईल असं एमएमआरडीए प्रशासनाने सांगितले आहे
महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बालाकोटचा मुद्दा पुन्हा समोर आणला जातोय, राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन यांची लष्कर प्रमुखांवर टीका
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेतली, जागावाटप बाबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा
काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांचा प्रसारमाध्यम आणि संपर्क कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा, वैयक्तिक अडचण असल्यामुळे राजीनामा
शिर्डी : अकोलेमध्ये भाजपला धक्का, अजित पवार यांच्या उपस्थितीत अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, भाजप जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे, सुनीता भांगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत,
पिचड पिता-पुत्रांविरोधाक लढत देण्यासाठी राष्ट्रवादी सरसावली
मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनसमधून अंदाजे 44 लाख रुपये चोरीला, तिकीट बुकिंगमधून आलेले पैसे चोरट्यांनी केले लंपास, जीआरपी, आरपीएफ, मध्य रेल्वेचे मोठे अधिकारी घटनास्थळी
मुंबई : शेअर बाजारात मोठी उसळी, सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स 1200 अंकांनी वधारला, निफ्टीमध्येही 300 अंकांनी वाढ
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना भेटण्यासाठी आज तिहार जेलमध्ये जाण्याची शक्यता, चिदंबरम यांच्या पाठीशी काँग्रेस उभी असल्याचा संदेश देण्यासाठी भेट, जवळपास महिनाभरापासून चिदंबरम जेलमध्ये
मुंबई : हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत, कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रनेत बिघाड, हार्बर मार्गावरील गाड्या 10 ते 15 मिनिट उशिराने
मुंबई : ज्येष्ठ क्रिकेटपटू, उद्योगपती, मुंबईचे माजी नगरपाल माधव आपटे यांचं वृद्धापकाळाने निधन, वयाच्या 87 व्या घेतला अखेरचा श्वास, कसोटी कारकिर्दीत 7 सामन्यांमध्ये 542 धावा ज्यामधे एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश, सोलापूरच्या लक्ष्मी आणि विष्णू टेक्स्टाईल मिल्सचे मालक
भाजप अध्यक्ष अमित शाह 26 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर, युतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता, पुढील दोन दिवसांत युतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा, अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये जागावाटपाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. हाऊडी मोदीच्या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला सूचक इशारा, कलम 370 रद्द केल्याबद्दल टेक्सासमधील भारतीयांचं स्टँडिंग ओव्हेशन

2. मुस्लिम कट्टरपंथियांविरोधात एकत्र लढू, हाऊडी मोदी कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचं विधान, दहशतवाद पोसणाऱ्या राष्ट्रांना इशारा

3. देवेंद्र फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री, मुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शाहांची घोषणा, जागावाटपाचं घोडं अडलेलं असताना युतीसंदर्भात उल्लेख टाळला

4. उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या साताऱ्यात शरद पवारांचं जोरदार शक्तिप्रदर्शन, कार्यकर्त्यांची तुफान गर्दी, भाजपच्या दीपक पवारांचा राष्ट्रवादीत प्रवेश

5.मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वसईचे फादर दिब्रिटोंची निव़ड, 10 ते 12 जानेवारीला उस्मानाबादेत रंगणार 93 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

6. मराठमोळा पैलवान राहुल आवारेला कझाकस्तानमध्ये कांस्यपदक, जागतिक कुस्तीचं पदक मिळवणारा पहिला महाराष्ट्रीय पैलवान, पुण्यात जंगी सेलिब्रेशन

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.