नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाने ( UGC) मोठी घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना  (students ) यापुढे एकाच वेळी दोन पदवींसाठी प्रवेश घेता येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे  अध्यक्ष प्राध्यापक ममिदला जगदीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे.   


यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना दोन पदवी कार्यक्रमांतर्गत एकाचवेळी दोन पदवींसाठी प्रवेश घेता येणार आहे. म्हणजे विद्यार्थी प्रत्यक्ष (ऑफलाईन) अभ्यासक्रमातून एक आणि ऑनलाइन पद्धतीने एक, अशा दोन पदव्या एका वेळी घेऊ शकणार आहेत. विद्यार्थ्यांना ही पदवी वेगवेगळ्या दोन विद्यापीठातूनही पूर्ण करता येणार आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम आणि विद्यापीठाची निवड त्यांच्या आवडीनुसार करण्याचे स्वातंत्र्य यूजीसीने दिले आहे. 


यूजीसीने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पदवीपूर्व अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा डिप्लोमाच्या अभ्यासक्रमाच्या दोन पदवींना एकावेळी प्रवेश घेता येणार आहे. परंतु, यूजीसीच्या नियमानुसार पीएच.डी. सारख्या अभ्यासक्रमातून एकावेळी दोन पदवी घेता येणार नाही. याबरोबरच पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला पदव्युत्तर पदवीसाठी अर्ज करता येणार नाही.  


एकावेळी दोन पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी सबंधित विद्यापीठ किंवा कॉलेज निश्चित करेल. याबरोबरच या अभ्यासक्रमाचा लवकरच होणार्‍या CUET (कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट)शी काहीही संबंध नाही.  कारण ऑनलाइन पदवीसाठी प्रवेश परीक्षेची आवश्यकता नाही. ऑनलाइन मोडमध्ये विद्यार्थ्यांसाठी जास्त जागा असतील. यामुळे विद्यापीठांवर दबाव येणार नाही आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना दुसऱ्याही पदवीला प्रवेश घेता येणार आहे.   


महत्वाच्या बातम्या


SBI Recruitment : State Bank of India मध्ये भरती, अधिकारी पदांसाठी जागा, जाणून घेण्यासाठी बातमीवर क्लिक करा



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI