ठाणे: शरद पवार हे स्वत: कोणत्याही धर्माला मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण करतात, त्यांच्या पक्षामुळेच महाराष्ट्रात जातीय राजकारण फोफावतंय असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. शरद पवारांच्याकडे घेण्यासारखे अनेक चांगले गुण आहेत, पण त्यांच्या जातीय राजकारणाचे काय करायचं असा सवाल त्यानी केला आहे. ते ठाण्यातील 'उत्तर' सभेत बोलत होते. 


राज ठाकरे म्हणाले की, "राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून राज्यात जातीयतावाद वाढला. शरद पवार सांगतात हा महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांचा आहे. पण ते कधीच शिवरायांचे नाव घेत नाहीत. कारण त्यांना मुस्लिम मतांची काळजी आहे."


राज ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्र जातीच्या चिखलात अडकला आहे. पवारांसारख्या बुजूर्ग राजकारण्यांनी या राज्यातील जातीय भेद संपवले पाहिजेत. पण तेच लोकांना यात अडकवतात. घराघरात ज्यांनी शिवचरित्र पोहोचवलं ते बाबासाहेब पुरंदरे यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट होते. शरद पवारांना इतिहास नाही, तर जात बघायची आहे. यांच्यामुळेच मराठा-ब्राह्मण वाद वाढतोय. हे त्यांच्या राजकारणासाठीच सुरू आहे."


मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे निघाले. पण त्याचं झाल काय असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. निवडणुकींसाठी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापवण्यात आला आहे असाही आरोप त्यांनी केला. 


महाराष्ट्राला जाती नष्ट करत आहे. जातीपातीचं राजकारण आता शाळा, कॉलेजमध्ये गेलं आहे. जातीमधून बाहेर पडलो नाही, तर कुठलं आलं हिंदुत्व? असा सवाल विचारत या सर्वातून बाहेर या अशी विनंती त्यांनी केली. 


भोंग्याच्या आवाजावरुन आपण राजकारण करत नाहीत तर मला हा महाराष्ट्र सुरक्षित रहावा वाटतोय म्हणून हे सर्व सुरू आहे असं राज ठाकरे म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या :