NEET-UG Counseling : NEET-UG ची प्रवेश प्रक्रिया 19 जानेवारीपासून; पाहा वेळापत्रक
NEET-UG Counseling 2021 : मेडिकल यूजी अॅडमिशन 2021 साठी नीट यूजी काउंन्सलिंग 2021 च्या तारखेची घोषणा झाली आहे.

NEET-UG Counseling 2021 : मेडिकल यूजी अॅडमिशन 2021 साठी नीट यूजी काउंन्सलिंग 2021 च्या तारखेची घोषणा झाली आहे. 19 जानेवारी पासून या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandviya) यांनी नीट यूजी काउंन्सलिंग 2021 च्या प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी याचं वेळापत्रकही जाहीर केलं आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती ट्वीट करुन दिली आहे.
गेल्या आठवड्यात मनशुख मांडवीय यांनी 12 जानेवारीपासून प्रवेश प्रक्रिया सुरु होईल, असे सांगितले होते. मात्र, ऐनवेळी हा निर्णय माघारी घेण्यात आला होता. आता पुन्हा एकदा प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. निवासी डॉक्टरांना आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आश्वासनानुसार सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर MCC द्वारे प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या विषयी अधिक माहितीसाछी मेडिकल काउंसलिंग कमिटीच्या https://mcc.nic.in संकेतस्थळाला भेट द्यावी.
पाहा वेळापत्रक ..
NEET-UG counseling to begin from January 19: Union Health Minister Mansukh Mandaviya
— ANI (@ANI) January 13, 2022
Schedule as follows: pic.twitter.com/zllKWmXInm
NEET OBC Reservations : 'तात्काळ काऊंसलिंग सुरु करा',
वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने सात जानेवारी रोजी मंजुरी दिली . NEET पीजीसाठी काऊंसलिंग सुरु करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. ( Supreme Court approves OBC reservation in medical quota) मेडिकलच्या ऑल इंडिया कोटामध्ये 27 टक्के ओबीसी आणि 10 टक्के आर्थिक आरक्षण लागू करण्यास सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दाखवला आहे. जून 2021 मध्ये केंद्र सरकारनं ऑल इंडिया कोटामध्येही 27 टक्के ओबीसी आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला आव्हान देत अनेक विद्यार्थी सुप्रीम कोर्टात पोहोचले होते. त्यामुळे 28 सप्टेंबरला मेडिकल पीजी नीटचे निकाल लागूनही प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या:
- Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; गेल्या 24 तासात 46,723 रुग्णांची नोंद तर 32 जणांचा मृत्यू
- मुंबईतील रोजच्या कोरोना रुग्ण संख्या चढ-उताराचा निष्कर्ष नेमका काय काढायचा?
- Mumbai Corona Update : दिलासा! मुंबईत गुरुवारी नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांचे प्रमाण जास्त
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
