NEET-UG परीक्षेची तारीख जाहीर; 7 मे रोजी परीक्षा, रजिस्ट्रेशन केव्हापासून? वाचा सविस्तर
NEET-UG Date : नीट यूजी परीक्षेची (NEET-UG Exam 2023) तारीख जाहीर करण्यात आली आहेत. 07 मे 2023 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.
![NEET-UG परीक्षेची तारीख जाहीर; 7 मे रोजी परीक्षा, रजिस्ट्रेशन केव्हापासून? वाचा सविस्तर Medical entrance exam NEET UG to be conducted on May 7 2023 National Testing Agency NEET-UG परीक्षेची तारीख जाहीर; 7 मे रोजी परीक्षा, रजिस्ट्रेशन केव्हापासून? वाचा सविस्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/14/0061b237ed3bcf46c5fdb0fb81d7c1db1671019163054522_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
NEET-UG Exam Date 2023 : मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या 'नीट -2023' (NEET-UG Exam 2023) राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेच्या (National Eligibility Cum Entrance Test) तारीख जाहीर करण्यात आली आहे. 07 मे 2023 रोजी नीट यूजी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.
नीट यूजी परीक्षेची (NEET-UG Exam Date) तारीख लवकर जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळणार आहे. नीटसोबतच NTA ने अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा JEE Main आणि विद्यापीठ प्रवेश परीक्षा CUET UG चे वेळापत्रक देखील जाहीर केलं आहे. JEE मेन सत्र 1 ची परीक्षा जानेवारी आणि सत्र 2 ची परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये होईल. तसेचर CUET मे-जून महिन्यात घेण्यात येणार आहे.
Medical entrance exam NEET-UG to be conducted on May 7, 2023: National Testing Agency
— Press Trust of India (@PTI_News) December 16, 2022
जेईई मेनसाठी नोंदणी आधीच सुरू झाली आहे. दरम्यान NTA ने इतर परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रिया कधी सुरू होईल, याबाबत अद्याप तारखा जाहीर केलेल्या नाहीत. लवकरच रजिस्ट्रेशनच्या तारखा जाहीर करण्यात येतील.
लवकरच परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रियेची तारीख जाहीर होईल
एनटीए लवकरच नीट यूजी परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करेल. NEET UG 2023 चे नोंदणी अर्ज या अधिकृत वेबसाइट- nta.ac.in, neet.nta.nic.in वर प्रसिद्ध केले जातील. NEET 2023 चा अर्ज जारी झाल्यानंतर इच्छुक विद्यार्थी अर्ज शुल्क भरून अधिकृत वेबसाइटद्वारे नोंदणी करू शकतील.
'हे' विद्यार्थी नीट परीक्षेला बसण्यासाठी पात्र
नीट यूजी NEET UG परीक्षा नमुना, अभ्यासक्रम, अर्ज तपशील, पात्रता आणि पात्रता निकष, इतर माहितीसह संपूर्ण तपशील NTA कडून अधिसूचनेद्वारे जारी करण्यात येईल. NEET UG परीक्षेत बसण्यासाठी किमान वयोमर्यादा 17 वर्षे असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून इयत्ता 12 वी किंवा संबंधित विभागातील परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी नीट परीक्षेला बसण्यास पात्र आहे. याशिवाय विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमात गणित किंवा इंग्रजीसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र/जैव तंत्रज्ञान आणि इतर कोणत्याही पर्यायी विषयांचा समावेश असावा.
सविस्तर बातमी अपडेट होत आहे...
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)