एक्स्प्लोर

MAHATET : नीट यूजी परीक्षा 21 जूनला होणार, महाटीईटीच्या तारखेत बदल, महाराष्ट्र  राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय

MAHATET : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं नीट यूजी परीक्षेमुळं महाटीईटी परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 

MAHATET EXAM पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं महाटीईटीच्या तारखेत बदल केला आहे. आता महाटीईटी परीक्षा 21 जून ऐवजी 28 जूनला होणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठीची आवश्यक असलेली नीट यूजी परीक्षा 3 मे रोजी पार पडली होती. मात्र, त्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यानं संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आली. आज केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 21 जून रोजी नीट यूजी परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यामुळं महाटीईटी परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतला आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखेत बदल

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET) - 2026 परीक्षेचे आयोजन 21 जून रोजी करण्यात आलं होतं.  मात्र, नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं 21 जून रोजी  नीट यूजी परीक्षेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. नीट यूजी परीक्षा  संपूर्ण देशभरात विविध केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे. नीट यूजी आणि महाटीईटी या दोन्ही परीक्षांची बहुतांशी केंद्र एकच येत असल्याने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाटीईटी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आणि परीक्षार्थींचं हित लक्षात घेत तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. यामुळं टीईटी परीक्षा 21 जून ऐवजी 28 जूनला होणार आहे.  

विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कधी पासून मिळणार?

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र 16 जून ते 28 जून या कालावधीत मिळणार आहेत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे दोन पेपर असतात. 28 जून रोजी सकाळी 10.30 ते 1 वाजेपर्यंत  शिक्षक पात्रता परीक्षा पेपर I आयोजित करण्यात येईल. यानंतर पेपर II  दुपारी अडीच ते पाच वाजेपर्यंत घेण्यात येईल. याशिवाय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही सांगितलं आहे. अधिक अपडेटससाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटला भेट देत राहावं. 

नीट यूजी परीक्षा 21 जूनला होणार

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी नीट यूजी पुनर्परीक्षा येत्या 21 जूनला होणार असल्याचं सांगितलं. याशिवाय विद्यार्थी स्वत:  परीक्षा केंद्र निवडू शकतात. नीट यूजी परीक्षा पुन्हा घेत असताना विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही. याशिवाय 3 मे रोजी झालेल्या परीक्षेसाठी भरलेलं परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत

Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर

माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास

नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा

Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Embed widget