एक्स्प्लोर
Advertisement
SSC Results 2020 | मार्क अपेक्षेपेक्षा कमी? उत्तरपत्रिकेची कॉपी हवीय, रिचेकिंग करायचंय, मग 'हे' करा!
Maha SSC Results 2020: दहावीचा निकाल जाहीर (Maharashtra SSC Results 2020 Declared) झाला. विद्यार्थ्यांना आपली उत्तरपत्रिकेची झेरॉक्स प्रत हवी असेल किंवा मार्कांचं रिचेकिंग करायला अर्ज करायचा असेल तर त्यांनी काय करायचं? असा सवाल उपस्थित होऊ शकतो. यासाठी नेमकं काय करायचं? हे जाणून घेऊयात.
Maharashtra SSC Results 2020 : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा (Maharashtra SSC Results 2020 Declared) निकाल जाहीर झाला आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 17 लाख विद्यार्थ्यांची उत्सुकता संपली आहे. राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे.
आता निकाल तर लागला आहे. मात्र या निकालावर अनेक विद्यार्थी समाधानी असू शकत नाहीत. जर अशा विद्यार्थ्यांना आपली उत्तरपत्रिकेची झेरॉक्स प्रत हवी असेल किंवा मार्कांचं रिचेकिंग करायला अर्ज करायचा असेल तर त्यांनी काय करायचं? असा सवाल उपस्थित होऊ शकतो. यासाठी नेमकं काय करायचं? हे जाणून घेऊयात.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणपडताळणी उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मिळणे आणि पुनर्मूल्यांकनासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन अर्ज करावे लागत होते. पण आता या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरु केली जाईल.
बारावीचे विद्यार्थी http://verification.mh-ssc.ac.in या वेबसाईटवरुन अर्ज करु शकतील. या अर्जासाठी लागणारी फी सुद्धा आॅनलाईन भरावी लागेल. यासाठी उद्या 30 जुलैपासून 18 ऑगस्टपर्यंतची मुदत दिलेली आहे.
Maharashtra SSC Results | दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के, यंदाही मुलींची बाजी
242 विद्यार्थ्यांना 100 टक्के
दरम्यान, सर्व विभागीय मंडळांमधून नियमित विद्यार्थ्यांमध्ये कोकण विभागाचा निकाल (98.77 टक्के) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा (92 टक्के) आहे. या निकालात तब्बल 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. 242 पैकी 100 टक्के गुण मिळवणारे 151 विद्यार्थी फक्त लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल जरी सर्वधिक असला तरी 100 टक्के गुण मिळवणारे 151 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. यात नाशिक विभागातील एकही विद्यार्थी नसून फक्त 2 विद्यार्थी मुंबई विभागातील आहेत.2017 साली 193 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते. तर 2018 साली 125 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते. तर गेल्यावर्षी केवळ 20 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते.
SSC Results 2020 Highlights : निकालात मुलींचीच सरशी, जाणून घ्या दहावीच्या निकालासंदर्भात दहा महत्वाचे मुद्दे
8360 शाळांचा निकाल 100 टक्के
राज्यातील 22570 शाळांमधून 1754367 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 8360 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. या निकालात तब्बल 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तर एकूण 60 विषयांची परीक्षा घेण्यात आली, त्यामध्ये 20 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
SSC Results 2020 Highlights | बाबो...! राज्यात दहावीच्या तब्बल 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण
निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली
निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी मारली आहे. यंदा 3.1 टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त लागला आहे. तर कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
पुणे - 97.34 टक्के
नागपूर - 93.84 टक्के
औरंगाबाद - 92 टक्के
मुंबई - 96.72 टक्के
कोल्हापूर - 97.64 टक्के
अमरावती - 95.14 टक्के
नाशिक - 93.73 टक्के
लातूर - 93.09 टक्के
कोकण - 98.77 टक्के
विभागनिहाय टक्केवारी अशी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement