Maharashtra SSC Exams 2022 : राज्यात आजपासून दहावी बोर्डाची परीक्षा (SSC Board) सुरू होत आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर दहावीची ऑफलाईन परीक्षा सुरु होणार आहे. 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी दहावी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. दरम्यान, दहावीच्या परीक्षार्थिंना वेळ वाढवून देण्यात आला आहे. दहावीच्या लेखी परीक्षेत 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटं तर 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटं वाढवून देण्यात आली आहेत. 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board Of Secondary & Higher Secondary Education) वतीने घेण्यात येणाऱ्या मार्च एप्रिल 2022 दहावी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या परिस्थितीत दहावी परीक्षा ऐनवेळी रद्द करावी लागली होती. त्यामुळे दोन वर्षानंतर दहावी परीक्षा घेतली जात आहे. यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेला 16,39,172 विद्यार्थी बसणार आहेत. दहावी बोर्ड परीक्षेसाठी एकूण 22,911 शाळांमधील विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असून राज्यातील 21,284 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. आज पहिला पेपर हा प्रथम भाषेचा असणार आहे. 


दहावी परीक्षेचा सविस्तर वेळापत्रक



  • 15 मार्च : प्रथम भाषा (मराठी, हिंदी उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)

  • 16 मार्च : द्वितीय वा तृतीय भाषा 

  • 19 मार्च : इंग्रजी 

  • 21 मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)

  • 22 मार्च : संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय  (द्वितीय किंवा तृतीय भाषा)

  • 24 मार्च : गणित भाग - 1

  • 26 मार्च : गणित भाग 2

  • 28 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1

  • 30 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 

  • 1 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 1

  • 4 एप्रिल :  सामाजिक शास्त्र पेपर 2


विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करता दृष्टिकोनातून दहावी परीक्षेचं वेळापत्रक तयार करत असताना महत्त्वाच्या बहुतांश विषयाच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीनं मंडळामार्फत संपूर्ण राज्यात भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. विशेष महिला भरारी पथक आणि काही विभागीय मंडळात विशेष मुख्य अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे. 


दहावी बोर्डाच्या परीक्षांसाठी खास उपाययोजना :



  • नेहमीपेक्षा सुमारे पंधरा दिवस उशिराने परीक्षांचा आयोजन 

  • शाळा स्तरावर परीक्षा केंद्र उपकेंद्र देण्यात आली आहे

  • 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे

  • दहावीच्या लेखी परीक्षेत 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे तर 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वाढवून दिली आहे

  • तोंडी परीक्षा अंतर्गत मूल्यमापन याबाबत मूळ आराखडा विचारात घेऊन सुलभता ठेवण्याची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना मुभा देण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI