The Kashmir Files :

  सध्या सोशल मीडियावर द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files ) या चित्रपटाची चर्चा होत आहे. 11 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.  या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अनेक प्रेक्षकांना हा चित्रपट पाहिल्यानंतर अश्रू अनावर झाले. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर तीन दिवसामध्ये 25 कोटीपेक्षा जास्त कमाई केली. अनेक लोक हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याची वाट पाहात आहेत. जाणून घेऊयात हा चित्रपट ओटीटी कधी आणि कोणत्या प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे.  
 
द कश्मीर फाइल्स हा चित्रपट झी- 5 या ओटीटी प्लॅटफोर्मवर रिलीज होणार आहे.  जवळपास एक महिन्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होईल. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला आणि कथानकला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अक्षय कुमार, कंगना रनौत, परिणीती चोप्रा, आर माधवन आणि परेश रावल अशा अनेक कलाकारांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. 






'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाची निर्माती अभिषेक अग्रवाल   आणि विवेक रंजन अग्निहोत्री  यांनी केली आहे. मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, प्रकाश बेलावडी, अनुपम खेर, दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मंडलेकर, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाइक या कलाकारांनी या  चित्रपटात  महत्वाची भूमिका साकारली आहे. 


संबंधित बातम्या


TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


The Kashmir Files : मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरातनंतर 'या' राज्यांत 'द कश्मीर फाइल्स' करमुक्त


The Kashmir Files : ‘द काश्मीर फाइल्स’ बनवण्याचा उद्देश काश्मिरी पंडितांबद्दल कणव नाही तर...; काँग्रेसचा गंभीर आरोप


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha