Russia Ukraine War : रशियानं युक्रेनवर (Russia Ukraine Conflict)  हवाई हल्ले अधिक तीव्र केले आहेत. रशियाकडून मारियोपोल शहरात  हवाई करण्यात आलेत. यात शहराचं मोठं नुकसान झालं. आग अजूनही कशी धगधगती आहे याचं चित्र समोर आलंय. या शहरातील शेकडो युक्रेनियन नागरिक मारले गेले आहेत. युक्रेन-रशिया युद्ध दीर्घकाळ सुरु राहिल्यास त्याचे परिणाम संपूर्ण जगावर होणार आहे.  जागतिक अन्न सुरक्षितता धोक्यात येणार, असा आयएमएफने (IMF) अहवाल दिला आहे. 


रशिया- युक्रेन युद्धाचे परिणाम व्यापक होणार आहे.  वाढत्या किंमतींमुळे पिकांच्या लागवडीस युक्रेन असमर्थ  आहे.  त्यामुळे गहू, मका लागवडीला मोठा फटका बसला आहे. युक्रेन आणि रशियामधील गहू उन्हाळ्यात निर्यात केला जातो. गव्हासाठी संपूर्ण युरोप या  दोन्ही देशांवर  निर्भर असून त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. रशिया- युक्रेन युद्धाचा परिणाम प्रारंभिक परिणाम किमतींवर होणार आहे.  ज्यामुळे इतर खाद्यपदार्थांच्या किंमती देखील वाढतील असं आंतरराष्ट्रीय मॉनिटरी फंड या संस्थेचं मत आहे.  मात्र, शेतकरी पेरणी न करु शकल्यास त्याचा पुरवठ्यावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. 

 

युक्रेनमधील युद्ध म्हणजे आफ्रिकेतील देशांवर थेट उपासमारी येण्याची भीती व्यक्त करण्यात  येत आहे.  काळ्या समुद्रातील निर्यातीतील अडचणींचा इजिप्तसारख्या देशांवर थेट परिणाम आहे.  इजिप्त, रशिया आणि युक्रेनकडून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या धान्य आयातीवर देश अवलंबून आहे.  आफ्रिकी देशांच्या आर्थिक गंगाजळीवर देखील परिणाम होणार आहे.  दुसरीकडे आयात करणाऱ्या देशांची देखील मोठी यादी आहे. यात अफगाणिस्तान, इथिओपिया, सीरिया, येमेनसारख्या देशांना मोठा फटका बसणार असून उपासमार होण्याची देखील भीती व्यक्त करण्यात आली आहे. 

 

युक्रेनचं सरकार कार्यरत असल्यानं युक्रेनची आर्थिक स्थिती स्थिर आहे.  मात्र रशिया-युक्रेन दीर्घकाळ सुरु राहिल्यास युक्रेनमध्ये विनाशकारी मंदीचा सामना करावा लागू शकतो. अनेक संस्थांकडून युक्रेनला युद्धात थेट आर्थिक मदत होतेय. सोबतच 2021 सालात युक्रेनचा आर्थिक विकासदर 3.2 टक्क्यांनी वाढता आहे. त्यामुळे एकीकडे दिलासा जरी असला तरी दुसरीकडे मात्र युद्ध सुरुच राहिलं आणि ही परिस्थिती कायम राहिल्यास युक्रेनची अर्थव्यवस्था किमान 10 टक्क्यांनी आकुंचेल. युक्रेन वर्षाच्या अखेरीस त्याच्या जीडीपीच्या 25 ते 35 टक्क्यांनी गमावू शकतो, अशी भीती आयएमएफकडून व्यक्त करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :