12th Exam Update : मुंबईत (Mumbai) बारावी बोर्डाचा (Hsc Peper) केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचं समोर आलं होतं. त्यापाठोपाठच आता श्रीगोंद्यात गणिताचा (12th Maths Paper) पेपर फुटला असल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील प्रकरणात पेपर फुटला नसल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी विधिमंडळात स्पष्ट केल्यानंतर आता राज्य शिक्षण मंडळानं देखील पेपर फुटला नसल्याचं म्हटलं आहे. 


राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी म्हटलं आहे की, विलेपार्लेतील घटनेत पेपर फुटला असे म्हणता येणार नाही. परीक्षा केंद्रावर उशिरा आलेल्या विद्यार्थिनीकडे पेपरमधील काही भाग आढळून आला. हा कॉपीचा प्रकार म्हणता येईल. पोलीस याबाबत कारवाई करत आहेत. उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देखील  सखोल चौकशी करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे या प्रकरणाचा इतर ठिकाणच्या परीक्षा केंद्राशी संबंध नाही. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही.बोर्डाच्या  अध्यक्षांनी निवेदन दिलंय. हा कॉपी चा प्रकार आहे. पेपर फुटलेला नाही. पेपर पुन्हा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं गोसावी यांनी म्हटलं आहे. 


दुसरीकडे मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नार्वेकर यांनी म्हटलं आहे की,  विलेपार्लेतील परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी पेपर सुरू झाल्यानंतर वीस मिनिटांनी आली.  एक्झाम कंडक्टरने तिला याबाबत जाब विचारला. तेव्हा संशय आल्याने मोबाईल चेक केला तर त्यामध्ये प्रश्नपत्रिका आणि तिच्या शिक्षकाने पाठवलेले काही उत्तर आढळली.  त्या शिक्षकाने आधीच तिला मेसेज केला होता की मी उत्तर पाठवेन.  त्यानंतर आम्ही त्या शिक्षकाला अटक केली आहे, असं सांगितलं आहे. 


बारावीचा पेपर फुटलाच नाही- शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड 


मुंबईत बारावीचा पेपर फुटला या विषयावर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत निवेदन सादर करत सभागृहाला या प्रकरणाबाबत माहिती दिली. वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, नियमानुसार सकाळी 10.20 वाजता प्रश्नपत्रिकेचं वाटप झालं होतं. विलेपार्ले येथील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीला उशीर झाला होता. तेव्हा तिचा फोन तपासला असता प्रश्नपत्रिकेचा काही भाग मोबाईलमध्ये 10.24 वाजता आढळून आला असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे हा संपूर्ण पेपर फुटला असं म्हणता येणार नाही असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


HSC Exam Paper Leak : श्रीगोंद्यात गणिताचा पेपर फुटला; बारावी बोर्डाच्या परीक्षांमधील पेपरफुटीचं सत्र थांबेना


HSC Exam Paper Leak : बारावीचा पेपर फुटला; कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI