एक्स्प्लोर

HSC SSC Result : बारावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता, बोर्डाचं काम अंतिम टप्प्यात, दहावीचा निकाल कधी लागणार?

HSC SSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावी आणि दहावीच्या परीक्षा झाल्या होत्या.  दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांना देखील आता दोन्ही परीक्षांच्या निकालाचे वेध लागले आहेत. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे.  बारावीचा निकाल येत्या आठवड्यात जाहीर होईल अशी माहिती आहे. तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटी जाहीर होऊ शकतो. 

बारावीचा निकाल येत्या आठवड्यात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून  फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती. बारावीचा निकाल तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात असून येत्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो. 

दहावीचा निकाल कधी जाहीर होणार?

बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या आठवड्यात जाहीर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमकि परीक्षा मंडळ मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात निकाल जाहीर करु शकते.  दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या उत्तर पत्रिका तपासणीचं काम बोर्डाकडून तयार झालं आहे. उत्तर पत्रिका तपासणीचं काम पूर्ण झालं असून आता निकालाच तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. 

महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2023-24 या शैक्षणिक वर्षात वाढली आहे.  दहावीला 16 लाख 9 हजार 444  विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे. दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च दरम्यान पार पडली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या  पुणे ,नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर , अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण नऊ विभागीय मंडळांतर्फे परीक्षेचं आयोजन केलं जातं. 

सीबीएसईचा निकाल जाहीर

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल एकाच दिवशी जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं सर्वाचं लक्ष महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी लागणार याकडे लागलं आहे. 

संबंधित बातम्या : 

RTE Admission : आरटीईच्या एक लाख जागांवरील प्रवेशासाठी नोंदणी कधी सुरु होणार? शालेय शिक्षण विभागाकडून मोठी अपडेट

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NEET Exam Paper Leak: NEET पेपर फुटीमुळे परभणीतील कुटुंबावर आयुष्यभराचं व्रण, डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या प्रथमेशचं टोकाचं पाऊल, कुटुंबियांनी हंबरडा फोडला
NEET पेपर फुटीमुळे परभणीतील कुटुंबावर आयुष्यभराचं व्रण, डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या प्रथमेशचं टोकाचं पाऊल, कुटुंबियांनी हंबरडा फोडला
Neet Paper Leak: नीट पेपरफुटीत मोठा खुलासा! डॉक्टर मनोज शिरूरेच्या फ्लॅटवर भरायचे 'विशेष क्लासेस'; प्राध्यापक कुलकर्णी घ्यायचा वर्ग, भरमसाठ फी अन्....
नीट पेपरफुटीत मोठा खुलासा! डॉक्टर मनोज शिरूरेच्या फ्लॅटवर भरायचे 'विशेष क्लासेस'; प्राध्यापक कुलकर्णी घ्यायचा वर्ग, भरमसाठ फी अन्....
NEET Paper Leak: मनीषा हवालदारकडून प्रश्न घेतले अन् वहीत लिहिले; 20 हजार दिल्याची चर्चा, पुण्याच्या APMA अकॅडमीच्या शिक्षकाला अटक, सीबीआयकडून लॅपटॉप, मोबाईल जप्त
मनीषा हवालदारकडून प्रश्न घेतले अन् वहीत लिहिले; 20 हजार दिल्याची चर्चा, पुण्याच्या APMA अकॅडमीच्या शिक्षकाला अटक, सीबीआयकडून लॅपटॉप, मोबाईल जप्त
NEET Paper Leak Case News : नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी अपडेट, GOD म्हणून नंबर सेव्ह केलेल्या तेजस शाहसह डॉ. मनोज शिरूरेला अटक; तेरावी अटक सुद्धा महाराष्ट्रातूनच!
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी अपडेट, तेरावी अटक सुद्धा महाराष्ट्रातूनच! GOD म्हणून नंबर सेव्ह केलेल्या तेजस शाहसह डॉ. मनोज शिरूरे CBI च्या ताब्यात

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
Share Market : ट्रम्प यांच्या वेटिंगमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
Pimpri-Pune Liquor Poisoning: योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी
योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी
IPL Trade News : हार्दिक पांड्या घ्या, शिवम दुबे अन् आयुष म्हात्रे द्या.... आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 'ट्रेड'ची चर्चा; CSK कर्णधार बदलणार?
हार्दिक पांड्या घ्या, शिवम दुबे अन् आयुष म्हात्रे द्या.... आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 'ट्रेड'ची चर्चा; CSK कर्णधार बदलणार?
Satara Sangli MLC : मविआत सातारा सांगलीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला, उमेदवार कोण असणार? मतदारांची संख्या नेमकी किती? 
सातारा सांगलीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला, उमेदवार कोण असणार? मतदारांची संख्या नेमकी किती? 
Vasai Cyber Fraud : धक्कादायक! थेट न्यायाधीशांच्या पत्नीला सायबर चोरांनी घातला गंडा; 'ऑफिसर कोड' टाकताच बँक खातं रिकामं
धक्कादायक! थेट न्यायाधीशांच्या पत्नीला सायबर चोरांनी घातला गंडा; 'ऑफिसर कोड' टाकताच बँक खातं रिकामं
Embed widget