(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra HSC Results 2020 | सर्वांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा : मुख्यमंत्री
Maharashtra HSC Result 2020 declared today | राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 4.78 टक्क्यांनी वाढला आहे.
मुंबई : राज्याचा बारावी परीक्षेचा निकाल (Maharashtra HSC Results 2020 Declared) अखेर जाहीर झाला आहे. राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 4.78 टक्क्यांनी वाढला आहे. मागील वर्षी हा निकाल 85.88 टक्के लागला होता. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती, अखेर आता ही उत्सुकता संपली आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात.
विभागनिहाय निकाल कोकण - 95.89 पुणे - 92.50 कोल्हापूर -92.42 अमरावती - 92.09 नागपूर - 91.65 लातूर - 89.79 मुंबई - 89.35 नाशिक - 88.87 औरंगाबाद - 88.18
सर्वांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा : मुख्यमंत्रीआज बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला. हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो, तो तुम्ही यशस्वीपणे पार पाडला यासाठी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन! एकदा तुम्ही ठरवले की तुम्ही साध्य करू शकत नाही असे काहीही नाही. सर्वांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 16, 2020
बारावीचा टप्पा पार केलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन : शरद पवारज्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही, त्यांनी खचून जायची गरज नाही. आयुष्यातील सर्वच टप्प्यांवर आपण यशस्वी होतो असे नाही आणि एक परीक्षा आपले भविष्य ठरवत नाही. तुम्ही उद्याच्या समृध्द महाराष्ट्राचा कणा आहात. तुम्हाला उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 16, 2020
उच्च शिक्षणात पदार्पण करण्यासाठी महत्त्वाचा असणारा बारावीचा टप्पा पार केलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. इथून पुढे करिअरच्या दृष्टीने आपला महत्त्वाचा काळ सुरू होणार आहे. पुढील वाटचालीसाठी सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा.#12thExamResult pic.twitter.com/sigMswuRKq
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 16, 2020
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती : रोहित पवार निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं आहे. तसंच अनुतीर्ण विद्यार्थ्यांना नाउमेद न होण्याचा सल्ला दिला आहे. रोहित पवार यांनी शायरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं मनोधैर्य वाढवलं आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे की, "बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! एक मोठा शैक्षणिक टप्पा तुम्ही सर केला असला तरी यानंतर खरी कसोटी आहे, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नाउमेद होऊ नये. लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।
१२ वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! एक मोठा शैक्षणिक टप्पा तुम्ही सर केला असला तरी यानंतर खरी कसोटी आहे, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नाउमेद होऊ नये. लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। — Rohit Pawar (@RRPSpeaks) July 16, 2020
वर्षा गायकवाड यांच्याकडून मंडळाचे आभार तर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनमध्ये बारावीचा निकाल लावण्यासाठी काम करणाऱ्या मंडळाचं, अधिकारी, कर्मचारी, परीक्षक, नियामक, मुख्य नियामक, संस्थाचालक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसंच सर्व संघटनांचे आभार व्यक्त केले आहेत.
त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "इयत्ता 12 वीची लेखी परीक्षा दिनांक 18 फेब्रुवारी, 2020 ते 18 मार्च, 2020 या कालावधीत घेण्यात आली. राज्यात कोविड 19 विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता दिनांक 23 मार्च 2020 पासून राज्यात संचारबंदी/लॉकडाउन जाहीर करण्यात आला. व त्याचा कालावधी वेळोवेळी वाढवण्यात आला. सदर कालावधीत परीक्षोत्तर कामामध्ये अनेक अडचणी निर्माण होत होत्या. मात्र मंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी, परीक्षक, नियामक, मुख्य नियामक, संस्थाचालक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व संघटना यासर्वांच्या बहुमोल सहकार्यामुळे या कठीण परिस्थितीवर मात करुन मंडळाने ई-12 वीचा निकाल जाहीर केला. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन !
इयत्ता 12 वीची लेखी परीक्षा दिनांक 18 फेब्रुवारी, 2020 ते 18 मार्च , 2020 या कालावधीत घेण्यात आली. राज्यात कोव्हीड 19 विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता दिनांक 23 मार्च 2020 पासून राज्यात संचारबंदी / लॉकडाउन जाहीर करण्यात आला. व त्याचा कालावधी वेळोवेळी वाढवण्यात आला.सदर कालावधीत
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 16, 2020
कोकणची पोरं हुश्शार : निरंजन डावखरे बारावी निकालात सर्व नऊ विभागीय मंडळामधून कोकण विभागाचा सर्वाधिक 95.89 टक्के निकाल असून सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा (88.18 टक्के) आहे. विभागनिहाय निकालात बाजी मारणाऱ्या कोकणमधील विद्यार्थ्यांचं भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी अभिनंदन केलं आहे. सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कोकणची पोरं हुश्शार, आम्हाला त्यांचा अभिमान! बारावीच्या निकालात पुन्हा एकदा कोकणातील विद्यार्थ्यांनी राज्यात गुणवत्तेत अव्वल क्रमांक सिद्ध केला. विद्यार्थ्यांना अभिनंदनाबरोबरच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
— Niranjan Davkhare (@niranjandtweets) July 16, 2020
प्रफुल्ल पटेल यांच्याकडून अभिनंदन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही बारावीच्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंद केलं आहे. तसंच आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Congratulations to all the HSC pass out students on their huge & marvelous achievement! Good Luck to you as you move onto the next stage in your life. The future is bright and beautiful. Love it, strive for it & work for it!@VarshaEGaikwad #hscresults2020 #HSCResult #Exams2020 pic.twitter.com/oNgzLzO8JJ
— Praful Patel (@praful_patel) July 16, 2020
राधकृष्ण विखे पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन
प्रत्येक युवक-युवतीला करिअर संधी मिळवून देण्यास वचनबद्ध : सुभाष देसाईमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालान्त परिक्षा मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन !
— R Vikhe Patil (@RVikhePatil) July 16, 2020
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन : जयंत पाटीलबारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! पुढील करिअरसाठी अनेक शुभाशिर्वाद! अपेक्षित गुण मिळाले नसतील, तरी विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये. राज्यात प्रत्येक युवक-युवतीला करिअर संधी मिळवून देण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.@CMOMaharashtra @OfficeofUT @VarshaEGaikwad @AUThackeray
— Subhash Desai (@Subhash_Desai) July 16, 2020
संबंधित बातम्या Maharashtra HSC Results | बारावीचा निकाल जाहीर, इथं पाहा रिझल्ट Maharashtra HSC Results | मार्कांबाबत समाधानी नाहीत, उत्तरपत्रिकेची कॉपी हवीय, रिचेकिंग करायचंय, मग 'हे' करा! Maharashtra HSC Results 2020 LIVE | राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के Maharashtra HSC Results | निकालात मुलींची पुन्हा सरशी, बारावीच्या निकालासंदर्भात आठ महत्वाच्या गोष्टी Maharashtra HSC Results | राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के, मागील वर्षीच्या तुलनेत प्रगती Maharashtra HSC Results | बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल ४.७ टक्क्यांनी वाढला ही आनंदाची वार्ता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन???? pic.twitter.com/Fa5n8uwb1A
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) July 16, 2020
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI