एक्स्प्लोर

Maharashtra HSC Exam : दौंडमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास सहाय्य करणाऱ्या 9 शिक्षकांवर गुन्हा दाखल

Maharashtra HSC Exam : दौंडमध्ये बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत केल्याने स्थानिक 9 शिक्षकांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra HSC Exam : पुण्याच्या दौंड (Daund) तालुक्यातील केडगाव येथील जवाहरलाल माध्यमिक विद्यालयात बारावीच्या परीक्षेत (HSC Exam) विद्यार्थ्यांना कॉपी (Copy) करण्यासाठी मदत केल्याने स्थानिक 9 शिक्षकांवर (Teacher) यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालिंदर नारायण काटे (परीक्षा केंद्र संचालक), रावसाहेब शामराव भामरे (उपकेंद्र संचालक), प्रकाश कुचेकर, दिवेकर विकास, गोरगल शाम, कविता काशीद, जयश्री गवळी, सुरेखा होन, अभय सोननवर या शिक्षकांवर महाराष्ट्र गैरव्यहार प्रतिबंधक कायदा सन 1982, महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि इतर निर्दिष्ट परीक्षा कायदा 1982 चे कलम 8 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत. 

काय आहे प्रकरण?

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (27 फेब्रुवारी) बारावीची परीक्षा सुरु असताना भरारी पथकाने केडगाव येथील जवाहर विद्यालयात भेट देऊन तपासणी केली असता या ठिकाणी काही विद्यार्थी सामूहिक कॉपी करताना आढळून आले. आणि या सर्व प्रकाराला या ठिकाणी उपस्थित असणारे शिक्षक अप्रत्यक्ष रित्या जबाबदार असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारानंतर पथकातील प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी किसन दत्तोबा भुजबळ यांनी यवत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबवलं जात असतानाच शिक्षकांनीच या अभियानाला हरताळ फासल्याचं समोर आलं आहे.

परभणीत इंग्रजीचा पेपर फोडणाऱ्या सहा शिक्षकांना अटक

याआधी बारावी इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी (Copy) तयार करणाऱ्या परभणीतील सहा शिक्षकांविरोधात (Teacher) अखेर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती. परभणीच्या सोनपेठ शहरालगत असलेल्या महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीचा इंग्रजीचा पेपर अकरा वाजता देण्यात आला. हा पेपर देताच दोन शिक्षकांनी त्याचा फोटो काढून व्हॉट्सअॅपद्वारे इतर शिक्षकांना पाठवला. हे शिक्षक महाविद्यालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या एका खोलीत बसून त्याची विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करत होते. ही बाब समजताच सोनपेठ पोलीस ठाण्याच्या एका पथकाने त्यांना पकडले.

शिक्षण मंडळाकडून कॉपीमुक्त अभियान, मात्र...

दरम्यान एकीकडे शिक्षण मंडळ कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. बैठे पथक, भरारी पथक यासह पोलिसांची पथके परीक्षा केंद्राबाहेर तैनात करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे मात्र थेट परीक्षा केंद्रावरील शिक्षक अशाप्रकारे विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत करुन किंवा पेपर फोडून त्या विद्यार्थ्यांना कॉपी देण्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे या प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

हेही वाचा

Maharashtra HSC Exam : परभणीत बारावी इंग्रजीचा पेपर फोडणाऱ्या 'त्या' सहा शिक्षकांवर अखेर गुन्हा आणि अटक

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget