एक्स्प्लोर

SSC Exam Result 2026 : दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार! राज्य मंडळाकडून दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार;  वाचा A टू Z माहिती

SSC Exam Result 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.

Maharashtra Board SSC Exam Result 2026 पुणे : दहावीच्या विद्यार्थ्यांना ज्या क्षणाची आतुरता होती तो क्षण आता आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल  (SSC Result) अखेर आज जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (SSC Exam Result 2026) फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल आज(शुक्रवार, 8 मे) दुपारी 01.00 वाजता निकाल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत निकाल जाहीर करण्यापूर्वी सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद देखील घेतली जाणार आहे. या पत्रकार परिषदेतून दहावीचा विभागवार निकालासंदर्भात माहिती आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली जाईल. त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. (Maharashtra SSC Result 2026)

राज्यभरातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. या सर्व विभागांचा निकाल एकाच वेळी अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होईल. महाराष्ट्र बोर्डाने पुष्टी केली आहे की विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या पोर्टल्सवर निकाल पाहू शकतील. दोन्ही पोर्टल्सवर दुपारी १ वाजता एसएससी निकालाची लिंक सक्रिय होणार असल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र एसएससी उत्तीर्णतेची टक्केवारी 93.04 टक्के होती, तर 2024 मध्ये 95.81 टक्के आणि 2023 मध्ये 93.83 टक्के नोंदवली गेली आहे. त्यामुळे यंदाच्या निकाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दहावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहणार?

1. https://sscresult.mahahsscboard.in/
2. https://results.digilocker.gov.in     
3. https://mahahsscboard.in 
4. https://sscresult.mkcl.org 
5. https://results.targetpublications.org 
6. https://results.navneet.com 

दहावीचा निकाल कसा पाहणार?

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीची परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिली आहे. त्यांना उद्या दुपारी एक वाजता निकाल उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांनी त्यांचा परीक्षा क्रमांक आणि आईचं नाव नोंदवून निकाल पाहता येईल.  

स्टेप 1: mahahsscboard.in. या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
स्टेप 2: Maharashtra SSC Result 2026 ही लिंक उपलब्ध असेल त्यावर क्लिक करा 
स्टेप 3: विद्यार्थ्यांनी यानंतर रोल नंबर आणि आईचं नाव नोंदवून लॉगीन करावं. 
स्टेप 4: विद्यार्थ्यांनी सबमिट बटनावर क्लिक केल्यावर त्यांच्या स्क्रीनवर दहावीचा निकाल उपब्ध होईल 
स्टेप 5:  दहावीचा निकाल डाऊनलोड करा आणि प्रिंट काढून पुढील कामांसाठी सोबत ठेवा.  

दरम्यान,दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं तात्पुरत्या स्वरुपात गुणपत्रक मिळेल. मूळ गुणपत्रक संबंधित विद्यार्थ्याच्या शाळांमध्ये मिळेल. त्यासाठीची तारीख बोर्डाकडून जाहीर केली जाईल.  

Maharashtra Class 10 Result: विषयनिहाय गुणांची पडताळणी 9 मे पासून करता येणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार 8 मे 2026 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी यासंदर्भात अधिकृत प्रकटन प्रसिद्ध केले असून, पुणे, मुंबई, नागपूरसह नऊ विभागीय मंडळांचा निकाल एकाच वेळी संकेतस्थळांवर उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणांची पडताळणी 9 मे पासून करता येईल. राज्यभरातील तब्बल 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार असून, निकालाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही उत्सुकतेचे वातावरण आहे. मुंबई विभागातील सुमारे 3 लाख 48 हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य आज स्पष्ट होणार आहे.
 
इतर महत्वाच्या बातम्या
 
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget