एक्स्प्लोर

Devendra Fadnavis on Hindi: हिंदी भाषा का शिकली पाहिजे, मराठी शाळांमध्ये सक्ती का? देवेंद्र फडणवीसांनी शैक्षणिक धोरणाचं कारण उलगडून सांगितलं

Hindi in Education Policy: पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती, स्पष्ट शब्दात सांगतो, आम्ही खपवून घेणार नाही; राज ठाकरेंचा इशारा. देवेंद्र फडणवीसांकडून धोरणांचे समर्थन.

मुंबई: राज्यात यंदाच्या वर्षापासून लागू करण्यात येत असलेले शैक्षणिक धोरण हे नवे नाही. ते यापूर्वीच निश्चित झाले होते. यासंदर्भात कोणताही नवा शासन आदेश लागू झालेला नाही. शैक्षणिक धोरणानुसार (Education Policy) शाळांमध्ये करण्यात आलेली हिंदी भाषेची (Hindi Language) सक्तीचा निर्णय हा व्यापक दृष्टीकोनातून घेतला असावा, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मांडले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नव्या शैक्षणिक धोरणाबाबत सविस्तरपणे भूमिका मांडली.

राज्यात प्रत्येकाला मराठी आली पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. त्यासोबत देशाची भाषाही बोलता आली पाहिजे. केंद्र सरकारने जो विचार केला, देशात एक संपर्क भाषा असली पाहिजे, त्यादृष्टीने शैक्षणिक धोरणात हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय झाला. महाराष्ट्रात मराठी ही अनिवार्य असेल. मात्र, बाकीच्या भाषाही शिकू शकतात. देशात संपर्कसूत्र हिंदी भाषा आहे, त्यामुळे हिंदी लोकांनी शिकली पाहिजे. कोणाला इंग्रजी आणि अन्य भाषा शिकायची असेल तर मनाई नाही. हिंदी भाषा ही देशातील संपर्कसूत्र आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीपासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होईल. ही अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होईल. जूनपासून या धोरणाची अंमलबजावणी होईल. त्यानुसार राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकण्याच्या अनिवार्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या (English Medium)  शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा (Hindi Lagunage) शिकवली जाईल. तर अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असणार असतील. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीपासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होईल. तर पुढील वर्षी दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी इयत्तेसाठी नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यात येईल. 2028-29 पर्यंत राज्यात बारावीपर्यंत सर्व इयत्तांसाठी नवे शिक्षण धोरण लागू होईल. 

मेट्रो 7अ चा बोगदा इंजिनिअरिंग मार्व्हल: देवेंद्र फडणवीस

मेट्रो 7 अ मार्गिकेचे जे काम सुरु आहे, ते इंजिनिअरिंग मार्व्हल आहे. पहिल्यांदाच अपग्रेड मेट्रो ही अंडरग्राऊंड मेट्रोला मिळणार आहे. ज्याठिकाणी आज बोगदा खोदून पूर्ण झाला त्याठिकाणी एलिव्हेटेड आणि अंडरग्राऊंड मेट्रोचा संगम होतो. या भागातील मेट्रो स्थानके उभारणे आव्हानात्मक होते. अत्यंत कठीण परिस्थितीत हे काम पूर्ण करण्यात आले. एमएमआरडीएच्या माध्यमातून जयकुमार कंपनीने हे काम केले. तेच काम बघायला मी आलो होतो. मेट्रोचे काम अत्यंत वेगाने होत आहे. पुढील वर्षीपर्यंत 150 किलोमीटर मेट्रो मार्ग तयार होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

आणखी वाचा

आता महाराष्ट्रात पहिलीपासून इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची, नव्या शैक्षणिक धोरणामुळे वादंग निर्माण होणार?

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Thane Crime News: डोंबिवलीत मित्रानेच मित्राला संंपवलं, 20 दिवस बॉडी लपवली, पण मेलेल्या मित्राने स्वप्नात येऊन हैराण केलं, अखेर पोलिसांकडे जाऊन कबुली दिली
डोंबिवलीत मित्रानेच मित्राला संंपवलं, 20 दिवस बॉडी लपवली, पण मेलेल्या मित्राने स्वप्नात येऊन हैराण केलं, अखेर पोलिसांकडे जाऊन कबुली दिली
परफ्युम खरेदी न केल्याने फेरीवाल्यांकडून युवक-युवतीला मारहाण; तरुणीचा टी-शर्ट फाडून अश्लील शिवीगाळ, दोघांना अटक
परफ्युम खरेदी न केल्याने फेरीवाल्यांकडून युवक-युवतीला मारहाण; तरुणीचा टी-शर्ट फाडून अश्लील शिवीगाळ, दोघांना अटक
Chhaya Kadam on Ravi Jadhav: 'नटरंग' नंतर रवी जाधवांचा येतोय नवा सिनेमा, 'फुलवारा'ची जादू भुरळ घालणार; व्हिडिओ शेअर करत छाया कदमांची दाद
'नटरंग' नंतर रवी जाधवांचा येतोय नवा सिनेमा, 'फुलवारा'ची जादू भुरळ घालणार; व्हिडिओ शेअर करत छाया कदमांची दाद
Satara Result 2026: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने 9 जागा जिंकल्या, पण रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या भावाचा पराभव, अध्यक्षपदासाठी पुन्हा रस्सीखेच होणार
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने 9 जागा जिंकल्या, पण रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या भावाचा पराभव, अध्यक्षपदासाठी पुन्हा रस्सीखेच होणार

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime News: डोंबिवलीत मित्रानेच मित्राला संंपवलं, 20 दिवस बॉडी लपवली, पण मेलेल्या मित्राने स्वप्नात येऊन हैराण केलं, अखेर पोलिसांकडे जाऊन कबुली दिली
डोंबिवलीत मित्रानेच मित्राला संंपवलं, 20 दिवस बॉडी लपवली, पण मेलेल्या मित्राने स्वप्नात येऊन हैराण केलं, अखेर पोलिसांकडे जाऊन कबुली दिली
परफ्युम खरेदी न केल्याने फेरीवाल्यांकडून युवक-युवतीला मारहाण; तरुणीचा टी-शर्ट फाडून अश्लील शिवीगाळ, दोघांना अटक
परफ्युम खरेदी न केल्याने फेरीवाल्यांकडून युवक-युवतीला मारहाण; तरुणीचा टी-शर्ट फाडून अश्लील शिवीगाळ, दोघांना अटक
Chhaya Kadam on Ravi Jadhav: 'नटरंग' नंतर रवी जाधवांचा येतोय नवा सिनेमा, 'फुलवारा'ची जादू भुरळ घालणार; व्हिडिओ शेअर करत छाया कदमांची दाद
'नटरंग' नंतर रवी जाधवांचा येतोय नवा सिनेमा, 'फुलवारा'ची जादू भुरळ घालणार; व्हिडिओ शेअर करत छाया कदमांची दाद
Satara Result 2026: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने 9 जागा जिंकल्या, पण रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या भावाचा पराभव, अध्यक्षपदासाठी पुन्हा रस्सीखेच होणार
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने 9 जागा जिंकल्या, पण रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या भावाचा पराभव, अध्यक्षपदासाठी पुन्हा रस्सीखेच होणार
राम पूर्णेकरांच्या जिवीताला धोका, कुटुंबीयांना पोलीस संरक्षण वाढवून द्या; मिनाक्षी शिंदेंचंच पोलीस आयुक्तांना पत्र
राम पूर्णेकरांच्या जिवीताला धोका, कुटुंबीयांना पोलीस संरक्षण वाढवून द्या; मिनाक्षी शिंदेंचंच पोलीस आयुक्तांना पत्र
NCP Leader Amit Shah Meeting: दिल्लीत राष्ट्रवादीचे नेते अन् अमित शाहांमध्ये खलबतं; गृहमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश, विलिनीकरणाबाबतही मोठं आश्वासन
दिल्लीत राष्ट्रवादीचे नेते अन् अमित शाहांमध्ये खलबतं; गृहमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश, विलिनीकरणाबाबतही मोठं आश्वासन
Maharashtra District bank Election Result 2026: सातारा आणि सांगली, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवे कारभारी कोण? वाचा नव्या संचालकांची संपूर्ण यादी
सातारा आणि सांगली, नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवे कारभारी कोण? वाचा नव्या संचालकांची संपूर्ण यादी
IND vs NZ पहिल्या वनडेआधी सराव सत्रात काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना... स्टार फलंदाज डेव्हन कॉनवे थेट हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय घडलं?
IND vs NZ पहिल्या वनडेआधी सराव सत्रात काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना... स्टार फलंदाज डेव्हन कॉनवे थेट हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय घडलं?
Embed widget