CBSE Board Exam 2022 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दुसऱ्या सत्राची परिक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होत आहे. सीबीएससी (CBSE) बोर्डाचे विद्यार्थी सध्या परिक्षेची तयारी करत आहेत. या बोर्डाची पहिल्या सत्राची परिक्षा डिसेंबर 2021 मध्ये झाली होती. या परिक्षेचे निकाल देखील जाहीर झाले. आता पहिल्या आणि दुसऱ्या सत्राचा निकाल हा दुसऱ्या सत्राचे निकाल जाहीर झाल्यानंतर cbse.nic.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थांना पाहता येतील. अनेक विद्यार्थी सध्या दुसऱ्या सत्राच्या परिक्षेची तयारी करत आहेत. जर तुम्हाला पेपर सोडवण्याची तयारी करायची असेल तर तुम्ही या सोप्या टिप्स फॉलो करू शकता.
परिक्षेच्या आधी करा लिहिण्याची प्रॅक्टिस
बॉर्ड परिक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी लिहिण्याची प्रॅक्टिस करणं अत्यंत गरजेचे असते. उत्तम हस्ताक्षर आवश्यक आकृत्या किंवा आलेख, सविस्तर उत्तर लिहिलेले पेपर तपासणे हे परीक्षकांना सोपे जाते. त्यामुळे अशा प्रकारचा पेपर लिहिण्याचा सराव करा.
वेळेकडे विशेष लक्ष द्या
परिक्षा सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांना 15 मिनीटांचा वेळ दिला जातो. या वेळेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका वाचायची असते. विद्यार्थ्यांनी पेपर सोडवताना वेळेकडे विशेष लक्ष द्यावे. शेवटचे 15 मिनीट सोडवलेला पेपर चेक करण्यासाठी राखून ठेवावीत. तुम्ही निवडलेल्या प्रश्नांची उत्तर लक्षपूर्वक लिहा. जिथे प्रश्नांसाठी ऑप्शन्स असतील त्या प्रश्नांची उत्तर व्यवस्थितपणे लिहा.
संबंधित बातम्या
- CBSE Term 2 Admit Card 2022 : 10वी-12वी टर्म 2 परीक्षेसाठी बोर्डाच्या नव्या गाईडलाईन्स; लवकरच प्रवेशपत्र जारी करणार
- CBSE Term 2 Exams 2022 : विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली, सीबीएसईकडून हॉल तिकीट जारी, कसं कराल डाऊनलोड?
- Exam : विद्यापीठ, महाविद्यालयांच्या ऑफलाईन परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना वेळ वाढवून द्या; युवासेनेची मागणी
- CBSE Term 2 Exam Preparation 2022 : चांगल्या रिझल्टसाठी विद्यार्थ्यांनी 'या' टीप्स फॉलो करा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI