CBSE Term 2 Exams 2022 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने CBSE टर्म 2 च्या परीक्षांसाठी प्रवेशपत्र जारी केले आहेत. CBSE टर्म 2 परीक्षा 2022 एप्रिल 26 पासून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा 26 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. तर इयत्ता दहावीची परीक्षा 24 मे रोजी आणि बारावीची परीक्षा 15 जून रोजी संपणार आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार CBSE च्या अधिकृत साइट cbse.gov.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.


बोर्डानं सर्व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्यामध्ये बोर्डानं असं म्हटलं आहे की, परीक्षेला बसताना प्रत्येकाला कोविड-19 पासून बचावाचा प्रोटोकॉल पाळावा लागेल. उमेदवारांकडे हँड सॅनिटायझर आणावं लागेल, मास्क वापरावं लागेल. यासोबतच आवश्यक अंतराचे नियमही पाळावे लागतील. पालकांनी आपल्या मुलांना कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबद्दल मार्गदर्शन करावं आणि विद्यार्थी आजारी पडणार नाही याची काळजी घ्यावी.


उमेदवारांना बोर्डानं जारी केलेल्या प्रवेशपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करावं लागेल. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचावं लागणार असून, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे.


कसं कराल हॉल तिकीट डाऊनलोड? 



  • सर्वात आधी CBSE ची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर क्लिक करा. 

  • होम पेजवर असलेल्या ई-परीक्षा टॅबवर क्लिक करा. 

  • एक नवं पेज ओपन होईल, जिथे विद्यार्थांना हॉल तिकीट (प्रवेशपत्र) साठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 

  • लॉगइन करण्यासाठी आपलं यूजर आयडी, पासवर्ड आणि पिन टाका. 

  • दहावी, बारावीसाठी CBSE टर्म 2 प्रवेश पत्र स्क्रिनवर दिसेल. 

  • हॉल तिकीट डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून घ्या. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI