MI vs PBKS : आज आयपीएलमधील (IPL 2022) मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स (MI vs PBKS) या दोन संघात सामना पार पडणार आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी आयपीएल संघ असणाऱ्या मुंबई संघाला यंदा एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यांनी सलग चार सामने गमावले आहेत. दुसरीकडे पंजाब किंग्सने चार पैकी दोन सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे मुंबई सलग चार पराभवानंतर आज विजयाचं खातं खोलणार का? याकडे अनेकांचे लक्ष आहे.


आयपीएलमध्ये (IPL 2022) आज होणाऱ्या या मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्याकडे अर्थात मुंबईच्या चाहत्यांचं अधिक लक्ष असणार आहे. कारण आयपीएलमधील सर्वात बलाढ्य संघ असून देखील यंदा मुंबईला एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यांनी सलग चार सामने गमावले आहेत. तर आजचा हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


कधी आहे सामना?


आज 13 एप्रिल रोजी होणारा हा मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :