CBSE Term 2 Exam Preparation 2022 : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, CBSE ने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी टर्म 2 परीक्षेसाठी आवश्यक सूचना जारी केल्या आहेत. परीक्षेसाठी काही दिवस शिल्लक आहेत. जशी परीक्षा जवळ येते तसा विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण येतो.  अभ्यास न झाल्याची जाणीव,  आत्मविश्वासाचा अभाव आदी सगळ्या गोष्टी या तणावास कारणीभूत ठरतात. तसेच त्यांच्या परीक्षेच्या तयारीवर देखील परीणाम होतो.  परीक्षेचा ताण न घेता पूर्वतयारी करण्यासाठी काही टिप्स


बोर्डाच्या अभ्यासक्रमाला प्राधान्य


परीक्षेला 15 दिवस शिल्लक असताना विद्यार्थ्यांनी सीबीएसईने ठरवून दिलेला अभ्यासक्रम करावा. कारण या वर्षी बोर्डाने ठरवून  दिलेल्या अभ्यासक्रमातील प्रश्न परीक्षेला विचारले जाणाप आहे. त्यामुळे बोर्डाने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रम फॉलो करा


एनसीईआरटीचा अभ्यास सुरू ठेवा


विद्यार्थ्यांनी एनसीईआरटीचा अभ्यास करणे सुरू ठेवावा. बारावीचा अभ्यास  करताना रेफरन्स पुस्तकांचा अभ्यास करण्याची आवश्यकता असते. परंतु हा अभ्यास करताना  एनसीईआरटीचा अभ्यास करण्याची देखील गरज आहे. एनसीआईआरटी हा प्रत्येक परीक्षेचा बेस आहे आणि परीक्षएत या संदर्भातील प्रश्न विचारले जाते. त्यामुळे एनसीईआरटीता अभ्यास करणे बंद करू नका


सराव प्रश्नपत्रिका सोडवा


स्वतःच्या नोट्स स्वतःच काढा. उजळणी करा. नोट्स, उत्तरं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सराव प्रश्नपत्रिका सोडवा. 


टर्म 1 च्या गुणांवर लक्ष ठेवा


विद्यार्थ्यांनी आपले टर्म 1 च्या गुणांवर लक्ष ठेवा. जर टर्म 1 च्या एखाद्या विषयात गुण कमी मिळाले असेल तर विद्यार्थ्यांनी त्या विषयावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. तसेच जर टर्म 1 ला एखाद्या विषयात चांगले गुण मिळाले तर ते कायम ठेवले पाहिजे. कारण टर्म -1 आणि टर्म- 2 च्या परीक्षेचे गुण मिळवून फायनल स्कोर येणार आहे


उजळणी करा


परीक्षेला  थोडेच दिवस राहिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उजळणीवर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे.  तुम्ही काढलेल्या नोट्सची जास्तीत उजळणी करा


संबंधित बातम्या :


CBSE Term 2 Admit Card 2022 : 10वी-12वी टर्म 2 परीक्षेसाठी बोर्डाच्या नव्या गाईडलाईन्स; लवकरच प्रवेशपत्र जारी करणार


CBSE Date Sheet 2022: CBSE बोर्डाचे दहावी, बारावीचे वेळापत्रक जाहीर, असे पाहा वेळापत्रक


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI