CBSE Term 2 Admit Card 2022 : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, CBSE ने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी टर्म 2 परीक्षेसाठी आवश्यक सूचना जारी केल्या आहेत. 26 एप्रिल 2022 पासून सुरू होणाऱ्या या परीक्षेला यंदा 10वी आणि 12वीचे 34 लाख विद्यार्थी  बसणार आहेत. बोर्डाने सर्व सीबीएसई संलग्न शाळांना नव्या सुचना पाठवल्या आहेत. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे बोर्डाने कोविड-19 बाबत घेतलेली कठोरताही आता कमी केली आहे, त्यामुळे बोर्डाने नव्या सुचना कोविड-19 बद्दल आहेत. 


प्रवेशपत्र कधी जारी केले जाईल?
CBSC बोर्ड लवकरच 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच प्रवेशपत्र आणि रोल नंबर जारी करणार आहे. या आठवड्यात दहावी आणि बारावी परीक्षांचे रोल नंबर आणि प्रवेशपत्रके CBSE संलग्न शाळांना पाठवली जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.  परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांमध्ये त्याचे वाटप केले जाईल. तर खाजगी विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जारी केले जातील.


CBSE टर्म 2 बोर्ड परीक्षा 2022: मार्गदर्शक सुचना
परीक्षा हॉलमध्ये एका वर्गात 12 ऐवजी 18 विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी असेल. 
सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क आणि तापमान मोजण्यासारख्या सूचना पूर्वीप्रमाणेच आहेत.
टर्म 2 प्रश्नपत्रिका कस्टोडियन्सना पाठवल्या जातील.
जिओ टॅगिंग आवश्यक असेल.
पडताळणी तीन टप्प्यात केली जाईल.
परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर केंद्र अधीक्षक देखरेख करतील
टर्म 2 परीक्षा दोन तासांची असेल. 
सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना सकाळी 9.30 पर्यंत परीक्षा केंद्रावर हजर राहावे लागेल. 
सकाळी 10.00 नंतर परीक्षा केंद्रावर प्रवेश बंद केला जाईल. 
त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
सकाळी 10:00 वाजता प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका वितरित केल्या जातील. 
विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 20 मिनिटे मिळणार आहेत.
परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र (CBSE रोल नंबर/अ‍ॅडमिट कार्ड) दाखवावे लागेल. 
त्यावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.


CBSE टर्म 2 प्रवेशपत्र कसे डाउनलोड कराल?




 



अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जा.


होमपेजवर दिसणार्‍या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.


 तुमचे वैयक्तिक तपशील भरा आणि सबमिट करा.


 प्रवेशपत्र स्क्रीनवर प्रदर्शित होईल.


डाउनलोड करा आणि CBSE टर्म 2 परीक्षेच्या प्रवेशपत्राची प्रत नेहमीच तुमच्याकडे ठेवा.


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI