University Exam : राज्यातील सर्वच विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये व्यवसाय त्यासोबतच अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र विद्यापीठ महाविद्यालयांच्या ऑफलाइन परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्याची विनंती युवासेनेच्या वतीनं करण्यात आली आहे.  


मागील दोन वर्षात कोरोनामुळे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्या होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांना फारसा लिखाणाचा सराव राहिलेला नाही.  आता जेंव्हा ऑनलाईन मोडमधून परीक्षा ऑफलाईन मोडमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहेत. तेव्हा अनेक विद्यार्थ्यांना पेपर लिखाणासाठी वेळ पुरत नाही, असं युवासेनेचे सचिव वरून सरदेसाई यांनी म्हटलं आहे. 


त्यामुळे ऑफलाईन पद्धतीत परीक्षा घेताना अर्धा ते एक तास लेखी परीक्षेचा वेळ वाढवून द्यावा, अशी विनंती उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.


ऑनलाईन परीक्षांमध्ये काही ठिकाणी गैरप्रकार होत असल्याची प्रकरणं उघडकीस आली होती. त्यानंतर राज्यातील सर्वच विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये व्यवसाय त्यासोबतच अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. यावर युवासेनेकडून विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी केली आहे. 




 



महत्त्वाच्या इतर बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI