एक्स्प्लोर

Paper Leak Bill : मोठी बातमी! पेपर लीक करणाऱ्यांना चाप! पेपर फोडल्यास 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांचा दंड

Winter Parliament Session : पेपर लीक केल्यास 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांचा दंडाची तरतूद करण्यासाठीचं विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं आहे.

Public Examination Bill 2024 : परीक्षांमध्ये होणारा वाढता गैरप्रकार आणि पेपर फुटीच्या (Paper leak) वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारकडून पाऊले उचलण्यात येत आहे. आता लवकरच पेपर लीक (Paper Leak Bill) करणाऱ्यांना आळा बसणार आहे. पेपर फोडल्यास आता कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने संसदेत (Parliament) विधेयक (Bill Against Paper Leaks) सादर केलं आहे. 

पेपर लीक करणाऱ्यांना चाप! 

लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा (अन्याय प्रतिबंधक) विधेयक 2024 सादर करण्यात आलं. या विधेयकानुसार पेपर लीक प्रकरणात दोषी आढळल्यास 10 वर्षांचा कारावास आणि एक कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, दुसऱ्याच्या जागी डमी परीक्षार्थी बनून परीक्षा दिल्यास तीन ते पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

पेपर फोडल्यास 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांचा दंड

संसदेत सोमवारी 5 फेब्रुवारीला परीक्षा अन्याय प्रतिबंधक विधेयक 2024 लोकसभेत सादर करण्यात आलं आहे. या विधेयकामुळे परीक्षांमधील गैरप्रकाराला आळा बसेल. पेपर लीक करणे, नक्कल करणे, अशी अनेक प्रकरणे गेल्या काही दिवसांपासून समोर आली आहे. याला आता आळा बसणार आहे.

विधेयक लोकसभेत सादर

केंद्र सरकारने सोमवारी लोकसभेत पेपर फुटीबाबत सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यम प्रतिबंध विधेयक 2024 सादर केलं आहे. देशातील विविध राज्यांमध्ये पेपरफुटीच्या आणि कॉपीच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत. अनेक राज्यांमध्ये याविरोधात कायदेही करण्यात आले आहेत, पण राष्ट्रीय पातळीवर याविरोधात कोणताही कायदा नाही. अनेक राज्यांमध्ये पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घ्याव्या लागल्या आहेत. 

पेपर फुटीप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा

पेपर लीक प्रकरणात दोषी सिद्ध झाल्यास दोषीला 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाईल. दुसऱ्याच्या जागी परीक्षा दिल्यास, दोषी आढळल्यास 3 ते 5 वर्षांची शिक्षा आणि 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला जाईल. त्याचबरोबर पेपरफुटी आणि कॉपी प्रकरणात कोणतीही संस्था सहभागी असल्याचे आढळून आल्यास परीक्षेचा संपूर्ण खर्च त्यांच्याकडून वसूल केला जाईल आणि तिची मालमत्ताही जप्त केली जाऊ शकते.

विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच या विधेयकाला मंजुरी दिली होती. परीक्षा अन्याय प्रतिबंधक विधेयक 2024 या प्रस्तावित विधेयकात गुन्हेगारीला लक्ष्य करून त्यावर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. विधेयकात उच्चस्तरीय तांत्रिक समितीचाही प्रस्ताव आहे. ही समिती संगणकाद्वारे होणारी परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठी शिफारशी करणार आहे. हा केंद्रीय कायदा असेल आणि त्यात संयुक्त प्रवेश परीक्षा आणि केंद्रीय विद्यापीठांच्या प्रवेशासाठीच्या परीक्षांचाही समावेश असेल.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget