Uttarakhand: पतंजली आचार्यकुलम स्कूलची कमाल, हायस्कूल आणि इंटरमिजिएटचा 100 टक्के निकाल
Board Results 2025: पतंजलीच्या आचार्यकुलम स्कूलच्या हायस्कूल आणि इंटरमिजिएटचा निकाल 100 टक्के लागला आहे. हायस्कूलमध्ये 153 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

Board Results News: हायस्कूल आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तराखंडच्या हरिद्वार येथील पतंजलीच्या आचार्यकुलम शाळेत आनंदाची लाट पसरली. या दोन्ही वर्गांमधील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामुळं शाळेच्या परिसरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे.
हायस्कूलमध्ये 153 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि सर्व पास झाले आहेत. शाळेचा सरारसरी निकाल 86.30 टक्के राहिला. अथर्व नावाच्या विद्यार्थ्यांनी 99.40 टक्के गुणांसह पहिलं स्थान पटकावलं. ध्रुव नावाच्या विद्यार्थ्यानं 98 टक्के गुण मिळत दुसरा क्रमांक मिळवला. सान्या सेजल हिनं 97.80 टक्के गुण मिळवत तिसरं स्थान पटकावलं. सहज यानं 97.60 टक्के आणि अशुमन आणि कन्हैया कुमार यांनी 97.40 टक्के मिळवत पाचवं स्थान मिळवलं.
43 विद्यार्थ्यांनी विविध विषयात मिळवले 100 टक्के गुण
आचार्यकुलम कडून सांगण्यात आलं की 21 विद्यार्थ्यांनी सर्व पाच विषयात A-1 ग्रेड मिळवली. 43 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयात 100 टक्के गुण मिळवले. 25 विद्यार्थ्यांनी 95 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले.
इंटरमिजिएटचा निकाल 88.38 टक्के
इंटरमिजिएटमध्ये 97 विद्यार्थी सहभागी झाले आणि ते पास झाले. शाळेचा सरासरी निकाल 88.38 टक्के लागला. विज्ञानाच्या शाखेचा निकाल 83.59 टक्के, मानव्यविद्या शास्त्रात 90.64 टक्के आणि वाणिज्या शाखेचा 90.85 टक्के निकाल लागला. सिद्धेश यानं 99 टक्के गुण मिळवत पहिलं स्थान मिळवलं. आर्यमन-98.6 टक्के, रिद्धिमा 98 टक्के यांनी अनुक्रमे मानव्यविद्या अन् वाणिज्य शाखेत पहिलं स्थान मिळवलं. 14 टक्के विद्यार्थ्यांनी पाच विषयात A-1 ग्रेड मिळवली. तर, 32 विद्यार्थ्यांनी विविध विषयात पूर्ण गुण मिळवले.
पीएम मोदींच्या आचार्यकुलम स्कूलचे उद्घाटन
आचार्यकुलम स्कूल हरिद्वारमध्ये कार्यरत असून निवासी शैक्षणिक संस्था आहे. ज्याची स्थापना योग गुरु रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी केली. याचं उद्घाटन 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. गुरुकुल पद्धतीवर या संस्थेचं काम चालतं. वैदिक शिक्षण आणि आधुनिक शिक्षणाचा संगम साधला जातो. आचार्यकुलम सीबीएसईशी संलग्न आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI























