मला धोका दिला, म्हणून मी तिचं मुंडकं छाटलं; प्रियकराचा कबुली जबाब, पोलीसही हादरले!
Crime News : पोलिसांनी प्रकरणाचा पुढचा तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपी अदनानला अटक केली. महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे, त्यानं पोलिसांसमोर आपला गुन्हा कबुल केला.
Crime News : मला धोका दिला, म्हणून मी तिचं मुंडकं छाटलं, असा कबुली जबाब एका आरोपीनं पोलिसांना दिला आहे. आरोपीचा जबाब ऐकून पोलीसही पुरते हादरुन गेले आहेत. ही घटना घडली उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये. एका तरुणानं त्याच्या प्रेयसीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली. घटनेची माहिती मिळतचा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी प्रकरणाचा पुढचा तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपी अदनानला अटक केली. महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे, त्यानं पोलिसांसमोर आपला गुन्हा कबुल केला.
मंगळवारी सकाळी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये स्थानिक लोकांना खुर्जाच्या मोहल्ला खीरखानी येथील स्मशानभूमीत एका महिलेचा मृतदेह आढळला. मृत महिलेची ओळख पटली असून आस्मा (30, रा. मोहल्ला नई बस्ती, खुर्जा नगर) असं मृत महिलेचं नाव आहे. याप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला. यामध्ये त्यानं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. आरोपी अदनाननं नोंदवलेल्या जबाबाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
आरोपीनं जबाबत म्हटल्यानुसार, त्यानं आपली अडीच वर्षांची कमाई त्याच्या प्रेयसीवर खर्च केली, मात्र तिनं त्याची फसवणूक सुरू केली आणि फसवणुकीची शिक्षा मृत्यूदंड आहे. फिल्मी स्टाईलमध्ये, अदानाननं सांगितलं की, जेव्हा त्याच्या प्रेयसीनं त्याला धोका दिला, तेव्हा त्यानं चाकूनं तिचा गळा चिरला. तो संजू मधील संजय दत्तच्या स्टाईलमध्ये बल्लू बल्लू करत होता. अदनानचे विवाहित अस्मासोबत अवैध संबंध होते, असंदेखील त्यानं सांगितलं आहे. अस्माचे आणखी कोणाशीही प्रेमसंबंध होते, ती मला फसवत होती, त्यामुळे तिचा खून करून मी मृतदेह स्मशानभूमीत फेकून दिला, असंही आरोपीनं जबाबत म्हटलं आहे.
एक हत्या करणाऱ्याचा एन्काउंटर होत नाही
आरोपी अदनान म्हणाला की, मैत्री आणि प्रेमात दो कोणी धोका देईल, त्याची हत्या केली जाईल. त्यासोबतच जर कोणी त्यांच्या कुटुंबाकडे डोळे वर करुनही पाहिलं, तर मात्र त्यांची खैर नाही. तसंही एक हत्या करणाऱ्याचा कोणी एन्काउंटर थोडी करतं. दहा हत्या करणाऱ्याचा एन्काउंटर केला जातो. मी तर आता एकच हत्या केली आहे. आरोपीचा हा धक्कादायक आणि हारवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला महिलेच्या मृत्यूसाठी अटक केली आहे. याप्रकरणी आणखी तपास सुरू आहे.