Solapur Crime: भयंकर! तरुणाला निर्वस्त्र करून गरम सळ्यांचे चटके देऊन संपवले, तोंडातून रक्त, छिन्नविछिन्न मृतदेह सापडला, माळशिरस हादरले
पोलिसांना या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. यात एका तरुणीचा आणि अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

Solapur Crime: राज्यात बीड, परभणी सारख्या भागातील मारहाण व हत्येचे क्रूर प्रकार सोलापूर जिल्ह्यातही उघड होऊ लागले आहेत. माळशिरज तालुक्यात भयंकर प्रकार घडला असून एका तरुणाला नग्न करून त्याच्या शरीरावर लोखंडी सळईने चटके देत हत्या करण्यात आल्याचे समोर आल्याने संपूर्ण सोलापूर हादरले आहे. (Solapur Murder) हा सगळा प्रकार अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून या तरुणाचा छिन्नविच्छिन्न मृतदेह वनविभागाच्या क्षेत्रात निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला. तरुणाच्या शरिरावर गंभीर जखमा असून तोंडातून रक्त, लोखंडी सळईच्या चटक्यांच्या जखमा अजून ताज्या आहेत. याप्रकरणी माळशिरज पोलिसांनी एका तरुणीस व अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. (Crme News)
राज्यात गुन्हेगारीने कळस गाठलाय. दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, किरकोळ कारणातून होणारी पाशवी मारहाण, लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा आकडा प्रचंड वाढतोय. राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे की नाही ? असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे.
नक्की घडले काय?
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील आकाश अंकुश खुर्द-पाटील वय 28 वर्ष या तरुणाचा माळशिरस-पिलीव रोड वर पिलीव हद्दीत असणाऱ्या वन विभागाच्या क्षेत्रामध्ये निवस्त्र मृत्यूदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. माळशिरस तालुक्यातील एका तरुणाची नग्न करून व चटके देऊन निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. त्याच्या शरीरावरती अनेक गंभीर जखमा असून यात गरम लोखंडी सळईने चटके दिले असल्यासारख्या जखमा दिसून येत आहेत. तोंडातून ही रक्त आलेले पहावयास मिळाले आहे . त्याच्या मृतदेहाशेजारीच त्याची मोटरसायकली आढळून आली असल्याने पिलीव सह परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पिलीव औट पोस्टचे पोलीस कर्मचारी यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. अजून शवविच्छेदनाचा अहवाल आला नसून यानंतर मृत्यूचे कारण समोर येऊ शकणार आहे . दरम्यान हा संपूर्ण प्रकार प्रेम प्रकरण किंवा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा संशय असून या प्रकरणी एक तरुणी आणि एक अल्पवयीन मुलाला माळशिरस पोलिसांनी ताब्यात घेतल आहे .
हेही वाचा:
.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
