एक्स्प्लोर

अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीचा फोटो व्हायरल, भाजपच्या सायली शिंदे यांना अटक, POCSO अंतर्गत गुन्हा दाखल 

Yavatmal Crime : अत्याचार झालेल्या एका शालेय विद्यार्थिनीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर भाजपच्या डॉ. सायली शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. 

यवतमाळ:  उमरखेड ( Umerkhed Minor Girl Viral Photo) येथील अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीचा फोटो व्हायरल केल्या प्रकरणी भाजपच्या महिला (BJP Mahila Aghadi) कार्यकर्ता डॉ. सायली शिंदे (Dr. Sayali Shinde) यांच्याविरुद्ध पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करत अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणी आपल्याला फसवलं जात असून जाणीवपूर्वक ही कारवाई केली जात असल्याचा आरोप सायली शिंदे यांनी केला आहे.
  
दोन दिवसांपूर्वी उमरखेड तालुक्यामध्ये एका शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्याच विषयामध्ये यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पिडीत मुलीची सायली शिंदे यांनी भेट घेतल्याचा फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. उमरखेड येथील एका कार्यकर्त्यांने सायली शिंदे यांच्याविरुद्ध उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यामध्ये भारतीय दंड सहित 228-A, 500, बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 आणि बालकाची लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार 23 (4) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 नुसार 66(E) यानुसार उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानुसार आज पोलिसांनी सायली शिंदे यांना अटक केली.

एखाद्या मुलीवर, महिलेवर किंवा अल्पवयीन मुलीवर जर अत्याचार झाला तर तिची कोणतीही ओळख समाजासमोर आणू नये, तिचे नाव वा फोटो प्रकाशित करू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालायने या आधी दिले आहेत. या प्रकरणात अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायली शिंदे यांची प्रतिक्रिया 

दरम्यान पोक्सो अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईवर सायली शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, 10 तारखेला एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. तिने एका सराईत गुन्हेगाराकडून स्वतःची सुटका करुन घेतल्यानंतर तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी, तिला प्रोत्साहन देण्यासाठी मी त्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी तिच्यासोबत माझ्या मोबाईलमध्ये फोटो घेतले होते. पण शुक्रवारी एका कार्यकर्त्यांने माझ्या मोबाईलमधून ते फोटो घेतले आणि व्हायरल केले. हे माझ्या विरोधात करण्यात आलेले षडयंत्र आहे. मी गोरगरिबांसाठी काम करत आहे, त्यामुळे माझ्याविरोधात जाणीवपूर्वक हे केलं जात आहे. तसेच या भागात एवढ्या समस्या आहेत, मी त्यावर आवाज उठवते. त्या समस्या बाहेर येऊ नयेत यासाठी माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Pune Expressway: प्रोपिलीन टँकरबाहेरील बर्फाला ड्रायव्हरने स्पर्श केला, दोन्ही हात भाजले, पेरुच्या झाडापासून बनलेल्या खुट्टीने हजारो प्रवाशांचा जीव वाचला
प्रोपिलीन टँकरबाहेरील बर्फाला ड्रायव्हरने स्पर्श केला, हात भाजले, पेरुच्या झाडापासून बनलेल्या खुट्टीने हजारो प्रवाशांचा जीव वाचला
Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेमुळे भाजपचा महापौर; काँग्रेसचा अवघ्या एका मताने पराभव; पक्षश्रेष्ठींचा आदेश न जुमानाऱ्यांवर वंचितकडून कारवाई
पक्षश्रेष्ठींचा आदेश असताना वंचितच्या नगरसेवकांची ऐनवेळी अनुपस्थिती; चंद्रपुरात काँग्रेसचा एका मताने पराभव, वंचितच्या शहराध्यक्षावर कारवाई
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Maharashtra Live blog updates: मुंबईत 10 कोटींचं सोनं वितळवून विकायला आणलं, काळबादेवीत पोलिसांनी दोघांना सापळा रचून पकडलं
Maharashtra Live blog updates: मुंबईत 10 कोटींचं सोनं वितळवून विकायला आणलं, काळबादेवीत पोलिसांनी दोघांना सापळा रचून पकडलं

व्हिडीओ

Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report
Revati Sule : सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंचं लग्न ठरलं? Special Report
Rahul Gandhi at Loksabha : संसदेत तिसऱ्या दिवशी तरी वादाची कोंडी फुटली की नाही? Special Report
Raj Thackeray Tweet On RSS : राज ठाकरेंचे मोहन भागवतांना पत्र Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Expressway: प्रोपिलीन टँकरबाहेरील बर्फाला ड्रायव्हरने स्पर्श केला, दोन्ही हात भाजले, पेरुच्या झाडापासून बनलेल्या खुट्टीने हजारो प्रवाशांचा जीव वाचला
प्रोपिलीन टँकरबाहेरील बर्फाला ड्रायव्हरने स्पर्श केला, हात भाजले, पेरुच्या झाडापासून बनलेल्या खुट्टीने हजारो प्रवाशांचा जीव वाचला
Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेमुळे भाजपचा महापौर; काँग्रेसचा अवघ्या एका मताने पराभव; पक्षश्रेष्ठींचा आदेश न जुमानाऱ्यांवर वंचितकडून कारवाई
पक्षश्रेष्ठींचा आदेश असताना वंचितच्या नगरसेवकांची ऐनवेळी अनुपस्थिती; चंद्रपुरात काँग्रेसचा एका मताने पराभव, वंचितच्या शहराध्यक्षावर कारवाई
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Maharashtra Live blog updates: मुंबईत 10 कोटींचं सोनं वितळवून विकायला आणलं, काळबादेवीत पोलिसांनी दोघांना सापळा रचून पकडलं
Maharashtra Live blog updates: मुंबईत 10 कोटींचं सोनं वितळवून विकायला आणलं, काळबादेवीत पोलिसांनी दोघांना सापळा रचून पकडलं
Mumbai Crime News : सोनं तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईच्या काळबादेवीतुन दोघांना अटक, तब्बल 10 कोटींचं सोनं जप्त
सोनं तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईच्या काळबादेवीतुन दोघांना अटक, तब्बल 10 कोटींचं सोनं जप्त
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
Ajit Pawar Memorial: अजित पवारांच्या स्मारकावरुन जय पवार-पार्थ पवारांमध्ये मतभिन्नता, नेमकं काय
Ajit Pawar Memorial: अजित पवारांच्या स्मारकावरुन जय पवार-पार्थ पवारांमध्ये मतभिन्नता, नेमकं काय घडलं?
Embed widget