Yashashree Shinde : रेल्वे पटरीजवळ मिळालेला यशश्री शिंदेचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला, उरण हत्याकांडाचे गुढ उलगडणार
Yashashree Shinde Murder Case : यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा हाती लागल्याने आरोपी दाऊद शेखला कडक शिक्षा सुनावण्यासाठी मदत होणार आहे.
मुंबई : उरण हत्याकांडात मोठी अपडेट समोर आली असून यशश्री शिंदेची हत्या केल्यानंतर आरोपीने तिचा लपवलेला मोबाईल पोलिसांच्या हाती लागला आहे. रेल्वे ट्रॅकच्या बाजूला एका टॉवरखाली हा मोबाईल लपवण्यात आला होता. पण पावसात भिजल्याने तो सुरू होत नाही. त्यामुळे पोलिसांनी तो मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासासाठी पाठवला आहे.
उरण येथील तरूणी यशश्री शिंदेची हत्या करून फरार झालेल्या दाऊद मसुद्दीन शेखला कर्नाटकमधून अटक करण्यात आली होती. हत्येनंतर यशश्री शिंदे हिचा मोबाईल गायब करून आरोपीने लपवून ठेवला होता. तपासाअंती सदरचा मोबाईल आरोपीने रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या टॅावर खाली ठेवल्याचे पोलीसांना सांगितले.
आरोपीने दिलेल्या माहितीनंतर सदर ठिकाणी जावून पोलिसांनी शोधमोहीम केली असता मोबाईल मिळाला. पण मोबाईल पावसात भिजल्याने सुरू होत नाही. त्यामुळे फॅारेन्सिक लॅबला मोबाईल पाठविण्यात येणार आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेला सुरा सुध्दा पोलिसांनी हस्तगत केला आहे.
गुन्ह्यातील महत्वाचे पुरावे हाती लागल्याने आरोपी दाऊद शेखला कडक शिक्षा सुनावण्यासाठी याची मदत होणार आहे.
गेल्या पाच वर्षांपासून आमच्या दोघांमध्ये मोबाईलवरुन संपर्क होता, अशी कबुली अटकेनंतर दाऊद शेखनं दिली आहे. मात्र, यशश्रीचा मोबाईल गहाळ झाला होता. त्यामुळे पोलिसांकडे दाऊदनं कबुली दिल्यानंतरही बक्कळ पुरावा नव्हता. आता यशश्रीचा मोबाईल सापडल्यामुळे पोलिसांना या प्रकरणाचा तपास करणं आता आणखी सोपं होणार आहे.
यशश्री शिंदे हत्याकांड नेमकं काय?
उरणमधील यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आलेली. एकतर्फी प्रेमातून गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमानं यशश्रीला अक्षरश: हालहाल करुन ठार मारल्याची (Uran Murder Cae) माहिती समोर आली.
यशश्रीच्या मारेकऱ्यानं निर्दयीपणे तिच्यावर वार केले, तिच्या शरीराची अक्षरशः विटंबना केली. तिच्या गुप्तांगावर आणि पोटावर अनेक वार करुन यशश्रीचा मृतदेह छिन्नविछिन्न करण्यात आला होता. त्यानंतर उरणमधील सगीर ब्रदर्स पेट्रोल पंपामागील मैदानावरील झुडुपांमध्ये तिचा मृतदेह फेकून देण्यात आलेला.
यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात एका दाऊद शेख नामक व्यक्तीचा उल्लेख केला. तेव्हापासूनच पोलिसांनी दाऊद शेखला शोधण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी जंग जंग पछाडलं, अखेर दाऊदचा सुगावा पोलिसांना लागलाच. यशश्रीचा आरोपी दाऊद शेखच्या कर्नाटकातून पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
ही बातमी वाचा: