एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

वर्ध्यात शेतकऱ्याच्या घरावर दरोडा,  55 पोतं सोयाबीन अन् सोनं लंपास 

Crime News : कारंजा तालुक्यातील नारा शिवारातील वाघोडा येथील घटना घडली, शेतकरी गोपाल पालिवाल यांच्या पोटात चाकू भोसकला 

वर्धा -  कारंजा तालुक्यातील वाघोडा येथे रात्रीत फार्म हाऊसवर मोठा दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली आहे. वाघोड्यात नागपूर येथील गोपाल पालिवाल या शेतकऱ्याचे फार्म हाऊस आहे. सात ते आठ दरोडेखोरांनी शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकला. 55 पोते सोयाबीन, सोन्याचे दागिने लुटून फार्म हाऊसवरील प्रतिकार करणाऱ्या एकाच्या पोटात धारदार  शस्त्राने भोसकून गंभीर जखमी केले. 

नागपूर येथील नारायण पालिवाल यांचे वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील वाघोडा येथील शेतात फार्महाऊस आहे. आठवड्यातून एकदा ते या फार्महाऊस वर येत असतात. त्यांचे पीक व शेतीचे उत्पन्न याच फार्महाऊस वर ठेऊन असते. रविवारी मध्यरात्री दरम्यान त्यांचा दरवाजा ठोठावला, त्यांच्या मुलाने दरवाजा उघडताच  पाच ते सहा जण अचानक तेथे आले व त्यांनी त्यांना मारण्यास व धमकविण्यास सुरुवात केली. यावेळी फार्महाऊस वर नारायण पालिवाल वय 80 वर्ष त्यांचा मुलगा गोपाल पालिवाल वय 50 व हरिकुमारी पालिवाल वय 70 हे हजर होते. या झटापटीत दरोडेखोरांनी गोपाल पालिवाल यांच्या पोटात चाकू खुपसला व त्याची आई हरिकुमारी पालिवाल यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील दागिने हिसकावून घेतले. सोबतच तिथे ठेऊन असलेले 55 पोते सोयाबीन लंपास केले. रविवारच्या मध्यरात्री हा सर्व थरार सुरू होता. पोटात चाकू भोसकल्याने गोपाल पालिवाल गंभीर जखमी झाले. दरोडेखोरांनी ऐवज लंपास करीत पळ काढला. 

गाडीतील हवा सोडली, मोबाईल सुद्धा हिसकावले- 

पालिवाल कुटूंब हे चारचाकी वाहनाने आपल्या फार्महाऊस वर आले होते. दरोडा पडल्यानंतर दरोडेखोरांनी पालिवाल कुटुंब हे पोलिसांपर्यंत पोहचू नये, यासाठी यांच्या चारचाकी वाहनाच्या चाकातील हवा सोडली. कुणाला संपर्क करू नये यासाठी त्यांचे मोबाईल सुद्धा हिसकावून नेले. पण पालिवाल कुटुंबाने मोठे धाडस दाखवून हवा सोडलेल्या वाहनानेच पोलीस ठाणे गाठले. आपलयासोबत घडलेली हकीकत सांगितली. विशेष म्हणजे ज्या मुलावर धारदार शास्त्राने हल्ला करण्यात आला त्याच जखमी मुलाने वाहन चालवत नेले.

घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी दाखवली तात्परता 

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी असलेले  चव्हाण हे तातडीने घटनास्थळी उपलब्ध झाले. तोपर्यंत कारंजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार  सुनिल गाडे, ए एस आय निलेश मुंढे, मंगेश मिलके, किशोर कापडे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिस्थिती वर नियंत्रण मिळविले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?Special Report Shilpa Shetty ED : शिल्पाचा घरी ईडी, राज काय? काय आहे पॉर्नोग्राफी प्रकरण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Embed widget