वसई: नवीन धंदा सुरू करण्यासाठी पैशाची गरज होती आणि तो पैसा मिळवण्यासाठी दोन आरोपींनी चक्क आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाचं अपहरण करुण हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्या करण्यात आलेला विद्यार्थी मिरा रोडमधील असून आरोपीही त्याच ठिकाणचे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून ठाणे न्यायालयानं दोघांनाही पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिरा रोडच्या शांती पार्क जवळील क्लस्टर 1 या हाय प्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलाचं अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आली. मिरा रोड मध्येच राहणारे आरोपी अफजल अन्सारी आणि इम्रान शेख यांना नवीन धंदा सुरु करायचा होता. या धंद्यासाठी लागणारे पैसे उभारण्यासाठी अफजल आणि इम्राननं श्रीमंत घरातील मुलाचं अपहरण करुन पैसे कमवण्याचा प्लॅन आखला. त्यानं मिरा रोडच्या क्लस्टर या हायप्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलाची निवड केली.
या मुलाची आई मुंबईमध्ये एका बारमध्ये गायिका म्हणून काम करत आहे. आरोपींनी अल्पवयीन मुलाला नवीन मोबाईल देतो असं सांगून त्याच्याशी मैत्री वाढवली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी 31 जुलैला रात्री 10 च्या सुमारास अल्पवयीन मुलाला आपल्या बरोबर नेवून, त्याच अपहरण केलं. त्याला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळील वासाड्या ब्रिजजवळ नेवून, त्याला ब्रिजवरुन खाली फेकून दिलं. तेथे तो वाचल्याने आरोपींनी त्या अल्पवयीन मुलाच्या पोटात चाकू भोसकून त्याची हत्या केली आणि मृतदेह ब्रीजखाली टाकून पसार झाले. त्यानंतर त्यांनी मयत मुलाच्या पालकाकडून 35 लाखाची खंडणी मागितली. तडजोडी अंती 25 लाखाची रक्कम ठरली. मात्र त्या अगोदरच काशिमीरा पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांना ठाणे न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Aurangabad: वीजपुरवठा खंडित झाला म्हणून थेट महावितरणच्या कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्याला झोडपले
- Mumbai Crime : आधी भंडाऱ्यात जेवून नंतर करायचे बाईक चोरी, 9 बाईकसह भावोजी आणि मेहुणा अटकेत
- Aurangabad: पत्नीच्या औषधांचा खर्च झेपेना म्हणून त्याने चोरीचा मार्ग पत्कारला; पोलिसांच्या कारवाईत धक्कादायक माहिती