KDMC Ganeshutasav 2022 : दोन वर्षानंतर येणारे सण-उत्सव यंदा उत्साहाने साजरा करता येणार आहेत. या पार्शवभूमीवर केडीएमसी पालिका आयुक्त भाऊसाहेब दांगड यांनी मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध उठवतानाच मंडप शुल्क माफी दिली आहे. त्याशिवाय फायर शुल्क 50 टक्क्यांनी कमी केल्याची माहिती दिली. या निर्णयामुळे  कल्याण डोंबिवली येथे यंदा उत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर यावेळी गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येतील असेही आयुक्त भाऊसाहेब दांगड यांनी सांगितलं.


कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत गणेशोत्सव न्यायालयाने दिलेल्या नियमानुसार साजरा करण्यासाठी गणेशोत्सव मंडळासोबत आज कल्याण डोंबिवली महापालिका आणि पोलिस प्रशासनाची बैठक महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात पार पडली. आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासह पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी पावसामुळे रस्त्यावरील खड्डे बुजवता येत नव्हते. आता पाऊस कमी झाला असला तरी हवामान खात्याने पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे. पावसाने उघडीप घेतल्यावर रस्त्यावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजविले जातील. तसेच पीओपीच्या मूतींना महापालिका हद्दीत बंदी आहे. उल्हासनगरातून पीओपीच्या मूर्ती कल्याण डोंबिवली हद्दीत विजर्सनासाठी येणार असतील तर उल्हासनगर महापालिका आयुक्तांना तसे सूचित केले जाईल. 


गणेशोत्सव मंडळाना परवानगीसाठी एक खिडकी योजना महापालिकेकडून राबविली जाणार आहे. तसेच मंडप शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय अग्नीशमन परवानगीकरीता आकारण्यात येणाऱ्या शुल्कात 50 टक्के सूट दिली असल्याचे यावेळी सांगितले. तर पोलीस उपायुक्त सचिन  गुंजाळ यांनी वाहतूक वळविणे, विसजर्न स्थळासह विसर्जन मार्ग, मंडळाचे मंडप आणि मूर्तीची सुरक्षा याठिकाणच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सतर्क असेल, असे सांगितलं.  तर मंडळांना परवानगीसाठी महाराष्ट्र सिटीझन पोर्टलची व्यवस्था करण्यात आली आहे.  त्याशिवा संपूर्ण उत्सवावर स्मार्ट कॅमेऱ्याची नजर असणार आहे. यासाठी आणखी काही ठिकाणी कॅमेरे बसविण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे करण्यात आल्याचे गुंजाळ यांनी यावेळी सांगितले.  तब्बल दोन वर्षानंतर कल्याण आणि डोंबिवली येथे गणेशउत्सोव उत्साहाने साजरा करता येणार आहेत. याला कोणतीही निर्बंध नसतील.