Lovepreet Singh, Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेच्या सहाव्या दिवशीही भारतीय खेळाडूंचं दमदार प्रदर्शन पाहायला मिळालंय. वेटलिफ्टिंगच्या पुरूष 109 किलो ग्राम वजनी गटात भारताच्या लवप्रीत सिंहनं (Lovepreet Singh) देशासाठी कांस्यपदक जिंकलंय. लवप्रीत सिंहनं स्नॅचमध्ये 163 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 192 किलो असं एकूण 355 किलो वजन उचलून कांस्यपदकावर कब्जा केला. लवप्रीतच्या यशस्वी कामगिरीनंतर भारताची राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेतील पदकसंख्या सहा सुवर्णासह चौदावर पोहचलीय.
वेटलिफ्टिंगच्या पुरूष 109 किलो ग्राम वजनी गटात लवप्रीत सिंहनं चांगली कामगिरी केली. दरम्यान, स्नेच प्रकारातील पहिल्या प्रयत्नात त्यानं 157 किलो ग्राम वजन उचललं. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 161 आणि तिसऱ्या प्रयत्नात 163 किलो वजन उचललं. तसेच क्लीन अँड जर्कमधील पहिल्या प्रयत्नात 185 किलो ग्राम वजन उचललं. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 189 आणि तिसऱ्या प्रयत्नात 192 किलोग्राम उजन उचललं. लवप्रीत सिंहच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारताच्या खात्यात आणखी एका कांस्यपदकाची भर पडली.
वेटलिफ्टिंगमध्ये भारताचा दबदबा
राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 14 पदक जिंकली आहेत. ज्यात पाच सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्यपदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, भारतानं सर्वाधिक पदक वेटलिफ्टिंगमध्येच जिंकले आहेत.
भारतासाठी पदक जिंकलेल्या खेळाडूंची यादी
सुवर्णपदक- 5 (मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ.)
रौप्यपदक- 5 (संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ.)
कांस्यपदक- 4 (गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह.)
हे देखील वाचा-
- Nagpur Sports : 'नेहरु कप' हॉकी क्रीडा स्पर्धेच्या नोंदणीसाठी गुरुवारपर्यंत मुदत
- CWG 2022: भारताच्या पदकसंख्येत आणखी भर; देशासाठी पदक जिंकून बर्मिंगहॅमध्ये तिरंगा फडकावलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी
- CWG 2022 Country-wise Medal Tally: कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताचं दमदार प्रदर्शन; पदकतालिकेत कोणता संघ कितव्या क्रमांकावर?