एक्स्प्लोर

Vasai: आपल्याच प्रेयसीला ठार मारणाऱ्या प्रियकरानेही केली आत्महत्या

Vasai: वसईत हॉटेलमध्ये तरुणीची हत्या करुन फरार झालेला तिच्या प्रियकरानेही बिहार मधील एका हॉटेल मध्ये गळफास घेवून, आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.

Vasai: वसईत हॉटेलमध्ये तरुणीची हत्या करुन फरार झालेला तिच्या प्रियकरानेही बिहार मधील एका हॉटेल मध्ये गळफास घेवून, आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. सागर असं या मृत तरुणाचे नाव आहे.  

काय आहे प्रकरण?

वसई पश्चिमेच्या स्टेट्स या हॅाटेलमध्ये 28 फेब्रुवारीला एका 26 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला होता. मुलगी आपला मित्र सागर नाईक सोबत त्या हॉटेलमध्ये आधल्या दिवसापासून होती. सागर सायंकाळीच निघून गेला. त्यावेळी दुसऱ्या दिवशी रुममधून काहीच हालचाल नसल्याने हॉटेलमालकांनी पोलिसांना बोलावून रुमचा दरवाजा उघडला. त्यानंतर तरुणीची हत्या झाल्याच कळलं. वसई पोलिसांनी सागरवर हत्येचा गुन्हा दाखल करुन, शोध सुरु केला होता. मात्र हत्येनंतर सागर झाला होता. 

बिहारमध्ये केली आत्महत्या

बिहारच्या मुझ्झफरपूर येथील आस्था हॉटेलमध्ये सागरने आत्महत्या केल्याच समोर आलं आहे. आस्था हॉटेलमध्ये 5 मार्चला दुपारी 12.30 ला सागर हॉटेलमध्ये आला होता. आणि तो 6 मार्चला हॉटेल सोडणार होता. 6 मार्चला सागर हॉटेलबाहेर न आल्याने शेवटी हॉटेलमालकांने बिहार पोलिसांनी बोलावून, दरवाज्या वरची काच तोडून आत प्रवेश केला. बिहार पोलिसांना सागरचा मृतदेह बाथरुमच्या जवळ सोफ्याखाली डोक असलेल्या अवस्थेत मिळाला. तर सागरने गळ्यावर नायलॉन केबल टाईच्या चार स्ट्रिपने गळा आवळा असल्याच दिसून आलं. नायलॉन केबल टाईचं बडल देखील पोलिसांना सागरच्या बॅगेतून मिळाला आहे. 

दरम्यान, सोमवारी रात्री वसई पोलिसांना कळवल्यानंतर सागरचे कुटुंब सागरचा मृतदेह वसईला आणण्यासाठी आज सकाळी बिहारला गेले आहेत. सागरने मरतेशेवटी काही चिठ्ठी लिहली आहे का? सागरने तरुणीची हत्या का केली? याबाबत काही पुरावे सापडतात का, हे शोधण्यासाठी माणिकपूर पोलीस ही बिहारला रवाना झाली आहे. 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Custodial Death Compensation : कोठडीत मृत्यू झाल्यास 'इतके' लाख नुकसानभरपाई, दोषी पोलिसांच्या पगारातून होणार वसुली, सरकारचा मोठा निर्णय
कोठडीत मृत्यू झाल्यास 'इतके' लाख नुकसानभरपाई, दोषी पोलिसांच्या पगारातून होणार वसुली, सरकारचा मोठा निर्णय
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget