Vasai Hit and Run : चिमुकला खेळताना खाली बसला, कारच्या चाकाखाली येऊनही पुन्हा उभा राहिला; वसईतील अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल
Vasai Hit and Run : वसईतील शिव भिम नगर, नाईकपाडा, वाळीव येथे 5 वर्षीय चिमुरड्याच्या अंगावर कार घातल्याच्या प्रकार घडलाय.
Vasai Hit and Run : गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने हिट अँड रनच्या (Vasai Hit and Run) घटना समोर येत असतानाच आता वसईमधून आणखी एक प्रकार समोर आलाय. वसई पूर्वेच्या शिव भिम नगर, नाईकपाडा, वाळीव येथे लहान चिमुकला खेळत असताना त्याच्या अंगावरुन कार घातल्याचा (Vasai Hit and Run) प्रकार समोर आलाय. दरम्यान, चिमुकल्याच्या अंगावरुन कार गेल्यानंतर चालक फरार झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. राघवकुमार चव्हाण उर्फ छोटू असं या पाच वर्षीय चिमुकल्याचे नाव आहे.
5 वर्षीय चिमुकल्याच्या अंगावरुन गाडी चढवली आणि फरार झाला
अधिकची माहिती अशी की, वसई पूर्वेच्या शिव भिम नगर, नाईकपाडा, वाळीव येथे आज (दि. 25) सकाळी 10.21 वाजता मोकळ्या जागेत एम.एच. 01 ई एम 3245 या क्रमांकाची कार एका प्रवाशाने ओला ॲपवरुन बुक करुन मागवली होती. कारमध्ये ड्रायव्हर आणि प्रवासी बसल्यानंतर पाच वर्षाचा राघवकुमार चव्हाण उर्फ छोटू हा गाडीच्या समोर आला आणि मातीत खेळत बसला. तेवढ्यात त्या कारचालकाने कार बेदराकपणे चालवत पुढे मुलगा बसलेला असल्याच न बघता त्याच्या अंगावरुन गाडी चढवली आणि फरार झाला. तेथील लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. माञ तो काही ही न ऐकता तेथून निघून गेला. तेथील लोकांनी ज्याने ओला बुक केली होती त्याच्याशी संपर्क साधला. त्याने ही आपण कार चालकाला घेवून येतो असे सांगत मोबाईलच स्वीच ऑफ केल्याची माहिती तेथील नागरीकांनी दिली आहे.
सध्या लहानग्याला वाळीवच्या वालवादेवी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्या हाताला, डोक्याला, छातीला दुखापत झाली असून, त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. आपण जर ही दृश्य बघत असाल तर थोडं विचलित ही होवू शकता, एका टी परमिट वाहनाने, पाच वर्षाच्या लहानग्याच्या छातीवरुन गाडी चालवून फरार झाला आहे. सीसीटीवीत ही दृश्य कैद झाली आहे.
कझाकिस्तानमध्ये 100 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारं विमान धाडकन कोसळलं, विमानाचा चक्काचूरhttps://t.co/Chn98LJWtm#Kazakhstan #planecrash #azerbaijan #world
— ABP माझा (@abpmajhatv) December 25, 2024
अक्षय शिंदेप्रमाणे विशाल गवळीलाही गोळ्या घाला, आमदार सुलभा गायकवाड यांची खळबळजनक मागणी#VishalGawali #Kalyan #Marathinewshttps://t.co/G6ftG2CA5X
— ABP माझा (@abpmajhatv) December 25, 2024
इतर महत्त्वाच्या बातम्या