Vasai Accident : कारने धडक देताच दुचाकीस्वार तब्बल 10 फूट उंच उडाला अन् हवेतच पलटी मारली
वसई : वसई (Vasai) पश्चिमेच्या बाभोला रोड (Babhola Road) येथे मोटारसायकल आणि कारची समोरासमोर जोरदार धडक (Accident) झाली. यामध्ये दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झालाय. ही घटना शुक्रवारी (दि.22) राञी १० च्या सुमारास अनिकेत कुटिन्हो असे जखमी झालेल्या मोटार सायकलस्वाराचं नाव आहे.
वसई : वसई (Vasai) पश्चिमेच्या बाभोला रोड (Babhola Road) येथे मोटारसायकल आणि कारची समोरासमोर जोरदार धडक (Accident) झाली होती. यामध्ये दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला होता. ही घटना शुक्रवारी (दि.16) राञी 10 च्या सुमारास अनिकेत कुटिन्हो असे जखमी झालेल्या मोटार सायकलस्वाराचं नाव आहे. दुचाकी आणि कारच्या धडकेचा (collision) थरकाप उडवणारा व्हिडीओ सध्या समोर आलाय. या धडकेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या चांगलेच व्हायरल होतं आहे.
कारने धडक देताच मोटारसायकल चालक 10 फुट उंच उडून, तीन वेळा तो हवेत पलटी मारल्याच दृश्य दिसत आहे. अनिकेत कुटिन्हो हा मोटार सायकलस्वाराचं नाव आहे. सध्या अनिकेतवर मीरा रोडच्या वोकहार्ट रुग्णालयात उपचार सुरु आहे. 20 ते 25 लाख खर्च येणार आहे. अनिकेची स्थिती चिंताजनक आहे. या रस्त्यावर स्ट्रीट लाईट नसल्याने येथे अपघात होत असल्याचं नागरिक सांगत आहेत. वसई पश्चिमेच्या बाभोला परिसरात रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला होता. मोटरसायकल आणि चार चाकी गाडी यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेमध्ये मोटर सायकलस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर वसईच्या कार्डिनल ग्रेसेस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दोघांची समोरासमोर धडक
प्रथम दर्शनी मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत कुटीनो हा जीम मधून आपल्या घरी दुचाकीवर वसईला जात होता. दरम्यान त्याच ठिकाणाहून समोरून चार चाकी गाडी ही वसई स्टेशनच्या दिशेने येत होती. दोघांची समोरासमोर धडक बसली. धडक एवढी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचं नुकसान झालं आहे. कारचे एअरबॅग उघडल्याने कार मधील वाहनचालकाला काही झालं नाही. मात्र यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या रस्त्यावर स्ट्रीट लाईट नसल्याने येथे अपघात होत असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातून (Sangli Crime) जाणाऱ्या रत्नागिरी -नागपूर महामार्गावर चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला होता. या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोणमध्ये हा भीषण अपघात घडला. भरधाव गाडीचा ताबा सुटल्याने डिव्हायडरला जाऊन धडकल्याने अपघात घडला. दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. सांगोल्याहून कोल्हापूरकडे जाताना कारचा अपघात झाला.
इतर महत्वाच्या बातम्या
इतर महत्वाच्या बातम्या